ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघ होणार मालामाल, कोणाला किती पैसे मिळणार, वाचा महत्वपूर्ण घोषणा..
आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ विश्वचषक खेळणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत हा विश्वचषक मर्यादित प्रेक्षकांच्या साथीने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. तरी त्याचे यजमानपद ‘बीसीसीआय’ भुषवत आहे.
23 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या मुख्य फेरीला प्रारंभ होईल. उपांत्य फेरीचे दोन सामने 10 आणि 11 नोव्हेंबरला खेळले जाणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होईल. उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
‘आयसीसी’ने केल्या महत्त्वपूर्ण घोषणा:
▪️ आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या संघाला 16 लाख डॉलर्सचा चेक देऊन गौरवण्यात येणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) रविवारी जाहीर केले.
▪️ उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर्स म्हणजे जवळजवळ 6 कोटी इतकी रक्कम ठेवली आहे. या स्पर्धेच्या उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर, तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या इतर 2 संघांना प्रत्येकी 4 लाख डॉलर देण्यात येतील.
▪️ ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना 4 लाख अमेरिकी डॉलर (3 कोटी) रुपये मिळतील.
▪️ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बक्षिस म्हणून एकूण 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच 42 कोटी रुपये पारितोषिक दिले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश असणार आहे.
▪️सुपर 12 स्टेजवर संपलेल्या प्रत्येक संघाला 70 हजार डॉलर्स (52 लाख रुपये) बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. फेरी लीगच्या 12 सामन्यांच्या दरम्यान, प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार डॉलर्स दिले जातील. फेरी -1 (पहिली फेरी) मधून बाहेर पडलेल्या 4 संघांना 40-40 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास 30 लाख रुपये मिळतील.
▪️यावेळेला प्रथमच पंच निर्णय आढावा प्रणालीचा (डीआरएस) ट्वेन्टी-20 विश्वचषकात समावेश करण्यात येणार आहे. एका डावात प्रत्येक संघाला दोन वेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची मुभा असेल.
▪️ या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याच्या दोन्ही डावांत 10 षटके झाल्यावर अडीच मिनिटांची जाहिरातीची विश्रांती घेण्यात येणार आहे.
सामन्यात पाऊस पडला तर नवीन नियम..!
पावसामुळे प्रभावित झालेल्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी आयसीसीने एक नवीन नियम बनवला आहे. DLS (Duckworth – Lewis – Stern method) नियमानुसार, साखळी टप्प्यातील सामन्यांना पावसामुळे अडथळा आल्यास दोन्ही संघांना 5 षटके फलंदाजी करणे आवश्यक असते, पण आता आयसीसीने सेमिफायनल आणि फायनलसाठी ही मर्यादा 10 ओव्हरपर्यंत वाढवली आहे. आता पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना किमान 10 ओव्हर फलंदाजी करावीच लागणार आहे, तरच सामन्याचा निकाल निघेल, असं आयसीसी ने म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511