SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑनलाईन सेलमध्ये खराब वस्तू मिळाल्यास इथे करा तक्रार, कंपनीवर अशी होणार कारवाई..

ऐन सणासुदीच्या तोंडावर विविध ऑनलाईन कंपन्यांनी (Online sale) त्यांचे ‘सेल’ जाहीर केले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात सवलती, कॅशबॅक ऑफर (cashback offer) दिल्या जात आहेत. परिणामी, ग्राहकांचा कलही तिकडे वळला आहे. मात्र, या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या ऑफर्सचा लाभ घेतानाही ग्राहकांनी सतर्क असणे गरजेचे आहे.

अनेकदा कमी पैशांत मिळणाऱ्या वस्तूच्या मोहात पडून आपण काहीतरी मागवतो नि कंपन्या आपल्या माथी खराब वस्तू मारतात. अशा वेळी तक्रार तरी कोणाकडे करावी, असा प्रश्न पडतो. अनेक जण त्याचा नाद सोडून देतात, मात्र त्यातून अशा कंपन्यांचे मात्र फावते.

Advertisement

ऑनलाईन शाॅपिंग (Online shopping) करताना, एखादी वस्तू खराब आल्यास, ग्राहकांना त्याबाबत तक्रार करता येते. त्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या नव्या ग्राहक कायद्याचा (Consumer Protection Act 2019) फायदा होऊ शकतो.

नवा ग्राहक संरक्षण कायदा-2019
केंद्र सरकारने नवा ग्राहक संरक्षण कायदा-2019 लागू केला आहे. तो ग्राहकांचं संरक्षण करतो. ऑनलाइन शॉपिंगवर आपला माल विकणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांना हा कायदा लागू आहे. त्यामुळे एखादी वस्तू खराब निघाल्यास, ती परत करण्याचा, तसेच कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.

Advertisement

देशातील मोठ्यात मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांपर्यंतही ऑनलाईन शाॅपिंग कंपन्यांचे जाळे विणलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 2020 पासून देशात ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू केला. आधीच्या कायद्यात ज्या कंपन्यांशी लढण्याचा अधिकार ग्राहकांना नव्हता, तो अधिकारही नव्या कायद्यात आहे.

खरेदी केलेली वस्तू खराब निघाल्यास, एखाद्या नियमाचे उल्लंघन झाल्यास ई-कॉमर्स कंपन्यांनाही शिक्षा आणि दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी ‘एमआरपी’पेक्षा जादा पैसे घेतल्यास कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले.

Advertisement

याआधी आपण खरेदी केलेल्या एखाद्या वस्तूत काही बिघाड झाल्यास कंपन्या ती बदलून देण्यास टाळाटाळ करीत. मात्र, नव्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे कंपन्यांना आता तसं करता येणार नाही. खोट्या जाहिराती आणि ग्राहकांना फसवणाऱ्या कंपन्यांविरोधातही आता कारवाई करता येणार आहे.

सेलमधील वस्तूंवरही कायदा लागू
ऑनलाईन सेलमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंसाठीही ग्राहक संरक्षण कायदा-2019 लागू असेल. ग्राहकांना खरेदीचं बिल दिले जात असेल, तर त्यावरही हा कायदा लागू होऊ शकतो. मात्र, बिल न देणाऱ्या कंपनीविरोधात खटला दाखल करणे कठीण असेल.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement