SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जम्मू-काश्मिरमध्ये भारताचे पाच जवान शहीद, दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, कशी उडाली चकमक वाचा..

जम्मू- काश्मीरमधील (Jammu Kashmir) पुंछ भागात आज (सोमवारी) भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. त्यात ‘जेसीओ’सह भारतीय सैन्य दलातील पाच जवान शहीद झाल्याची माहिती समोर येतेय.

जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील ‘डेरा की गली’ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. दरम्यान, सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला असून, हा पूर्ण परिसर सील (Seal) केला आहे. उशिरापर्यंत ही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येतंय

Advertisement

पाक सीमा पार करुन आलेले ३ ते ४ दहशतवादी पुॅंछ सेक्टरमध्ये मुगल रोडजवळील डेरा की गली परिसरात लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार लष्कराच्या जवानांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी अचानक दहशतवाद्यांनी लष्करावर अंधाधूंद गोळीबार सुरु केला.

या चकमकीत कनिष्ठ कमिशन्ड अधिकाऱ्यांसह (जेसीओ) 5 जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. अजूनही या परिसरात चकमक सुरु असून, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते.

Advertisement

दोन दहशतवादी ठार
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी (ता. 11 ) सुरक्षा दल नि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले, तर एक जण पळून गेला. अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे झालेल्या या चकमकीत एक पोलिस जखमी झाला आहे.

बांदीपोराच्या हाजिन भागातील गुंड जहांगीरमध्ये दुसरी चकमक झाली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेताना, झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. इम्तियाज अहमद डार, असे त्याचे नाव असल्याचे समजते. ‘लष्कर-ए-तोयबा’चा तो दहशतवादी होता.

Advertisement

दरम्यान, काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांकांची हत्या केल्यानंतर लष्कराने शोधमोहीम तीव्र केलीय. या भागात काल (रविवारी) जम्मू -काश्मीर पोलिसांनी मोहम्मद शफी लोन याच्या हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांच्या 4 साथीदारांना अटक केल्याचे समजते.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement