SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हैदराबाद’च्या या फास्ट बाॅलरला मोठे बक्षिस, टी-20 वर्ल्ड कपसाठी थेट टीम इंडियात निवड..!

आयपीएलच्या 14व्या हंगामात सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या एका गोलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उमरान मलिक.. होय, बरोबर ओळखले.. जम्मू-काश्मिरच्या या युवा गोलंदाजाने सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना सर्वात वेगवान चेंडू टाकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता..

आपल्या वेगवान गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना हैराण करणाऱ्या या युवा बाॅलरला आपल्या या कामगिरीचे मोठं बक्षीस मिळालं आहे. ते म्हणजे, त्याची थेट टीम इंडियात निवड करण्यात आलीय. आगामी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) तो भारतीय जर्सीत खेळताना दिसू शकतो.

Advertisement

सनराइजर्स हैदराबाद संघाकडून बंगळुरुविरुद्ध खेळताना त्याने आपल्या वेगवान बाॅलिंगने विराट कोहलीच्या बंगळुरु संघाला जेरीस आणले होते. त्याच्या कामगिरीमुळे हैदराबाद संघाने सामनाही जिंकला होता. मात्र, पराभवाचे दु:ख विसरुन विराटने उमरानच्या गोलंदाजीचे कौतुक करताना त्याला जर्सी भेट दिली होती.

आता त्याची थेट भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्या उमरानच्या वेगवान गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांना सरावात मोठा फायदा होणार आहे. तसेच विराट कोहली, रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंबरोबर सराव करण्याची संधी उमरानला भविष्यात उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement

“टीम इंडियात उमरानची निवड नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली असून, वर्ल्ड कपमध्ये तो भारतीय संघासोबत असेल. फलंदाजांना नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं एक चांगला अनुभव ठरेल. शिवाय भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करताना त्याच्याही अनुभवात वाढ होईल,” असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

जम्मू काश्मीरसाठी खेळताना उमरान मलिकने आतापर्यंत फक्त एक लिस्ट ‘ए’ एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. २१ वर्षीय उमरानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉपीतून त्याने टी-20 पदार्पण केलं होतं. त्यात त्याने 24 धावा देत 3 गडी बाद केले होते.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement