तुम्ही जर सातवी पास झालेले असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. महाराष्ट्र सागरी मंडळात (The Maharashtra Maritime Board) विविध पदांसाठी मोठी नोकरभरती होत आहे. सातवी पास उमेदवारांना नोकरीची (Job) संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळात तब्बल 48 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कशी असणार, त्यासाठी किती पगार मिळेल, अर्ज कसा नि कुठे करायचा, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या…
पुढील पदांसाठी होणार भरती..
खलाशी (Sailor)
ड्रेझर मास्टर/ऑपरेटर (Dresser Master/Operator)
ड्रेझर इंजिनिअर (Dresser Engineer)
मास्टर / सारंग (Master/Sarang)
इंजिन चालक (Engine Driver)
वगंणवार (Vaganwar)
पदनिहाय शैक्षणिक पात्रता नि पगार
खलाशी – सातवी पास, संबंधित पदांचा अनुभव, पगार- 24,000/- रुपये
ड्रेझर मास्टर/ऑपरेटर – दहावी पास, पदांचा अनुभव, पगार – 41,800/- रुपये
ड्रेझर इंजिनिअर – दहावी पास, पदांचा अनुभव, पगार – 41,800/- रुपये
मास्टर/सारंग – पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील मास्टर सर्टिफिकेट, पगार – 36,600/- रुपये
इंजिन चालक – सातवी पास, लायसन्स सर्टिफिकेट, पगार – 31,000/- रुपये
वगंणवार – सातवी पास, पदांचा अनुभव, पगार – 24,000/- रुपये
प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख – 21 आणि 28 ऑक्टोबर 2021
अर्ज कुठे करणार..?
https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home
मुलाखतीचा पत्ता
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड,
इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स,
2 रा मजला, रामजीभाई कमानी मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511