SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट..! ‘त्या’ पार्टीत पार्थ पवार होते का..? एनसीबीने दिले स्पष्टीकरण

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर (cruise) कारवाई करीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, आता या कारवाईवरुन भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

‘एनसीबी’ने या कारवाईत भाजप नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेव यालाही ताब्यात घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Advertisement

एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर भाजप नेत्यांच्या आदेशानुसार, तीन जणांना सोडून दिल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यावर  ‘एनसीबी’ने स्पष्टीकरण देताना, मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, की आपण योग्य पद्धतीने तपास करुन १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, कोणतेही पुरावे न सापडल्याने त्यातील 6 जणांना सोडून देण्यात आलं.

Advertisement

क्रुझवर पार्थ पवार होते का..
दरम्यान, एकीकडे आरोप-प्रत्यारोपाचे असे रणकंदन सुरु असताना, आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आलाय. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव या प्रकरणात प्रथमच समोर आल्याने खळबळ उडाली.

पत्रकार परिषद सुरु असताना, अचानक एका पत्रकाराने कारवाई करण्यात आलेल्या या क्रुझवर पार्थ पवार हेही होते का, तसेच ज्या लोकांना सोडण्यात आले, त्यात पार्थ यांचाही समावेश होता का, असा सवाल वानखेडे यांना केला.

Advertisement

वानखेडे यांचे स्पष्टीकरण
त्यावर वानखेडे म्हणाले, की “एनसीबीने क्रूझवरून एकूण १४ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील ६ जणांना पुराव्याअभावी सोडण्यात आले. मात्र, नेमके कोणाला सोडले, हे सांगता येणार नाही. कारण हा तपासाचा भाग आहे. ज्यांना अटक केलेली नाही, त्यांची नावे घेणे योग्य ठरणार नाही.”

“तुम्ही जे नाव घेत आहात, त्याबाबत मला काहीही सांगता येणार नाही. एनसीबी एक जबाबदार तपास यंत्रणा आहे. त्यामुळे एका चौकटीत राहूनच तुम्हाला माहिती देता येईल. जे पेपरवर आहे, ते मी तुम्हाला सांगू शकतो. पुराव्याशिवाय मला बोलता येणार नाही, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement