SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…तर एकही बॉल न खेळता मुंबई इंडियन्स जाणार आयपीएलच्या स्पर्धेबाहेर? कसं ते वाचा..

इंडियन प्रिमियर लीगमध्ये खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीमधून जवळजवळ बाहेर पडल्यात जमा आहे. कोलकाता नाईटर रायडर्सनं गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा 86 रननं मोठा पराभव केला आहे. कोलकाताच्या या विजयानं त्यांची प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित झाली आहे. आज (ता.शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे लागणार आहे.

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) केकेआरच्या विजयानं मोठा धक्का बसला. आता टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्सचा टॉप 4 मध्ये प्रवेश होणार का?

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिल्यांदा बॅटींग करुन 200 पेक्षा जास्त स्कोअर करावा लागेल, यानंतर मुंबईला हैदराबादवर किमान 171 रनने विजय मिळवणे आवश्यक आहे. आजच्या शुक्रवारच्या मॅचमध्ये हैदराबादचा (SRH) कॅप्टन केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली तर मॅचमधील पहिला बॉल पडण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल.

Advertisement

मुंबई इंडियन्सची पहिल्यांदा बॉलिंग आली तर रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम केकेआरला मागं टाकू शकत नाही. मुंबईनं अगदी पहिल्या ओव्हरमध्ये विजय मिळवला तरी ते शक्य होणार नाही. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेली मुंबई 12 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पण त्यांचा रनरेट -0.048 आहे. तर केकेआरनं राजस्थानवर मोठा विजय मिळवत त्यांचा रनरेट +0.587 इतका भक्कम केला आहे. मुंबईला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात जोरदार संघर्ष करावा लागला.

कोलकात्याने राजस्थानला पराभूत केल्याने राजस्थानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थानबरोबरच सनराईजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचंही स्पर्धेतील आव्हान संपलं आहे. कोलकात्याने आपल्या 14 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईचा एक सामना बाकी असून त्यांनी जो जिंकला तर त्यांचे सुद्धा 14 सामन्यांमध्ये 7 विजय होतील. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत कोलकाता सध्या +0.587 वर आहे तर मुंबई +0.048 वर आहे. त्यामुळे मुंबईने सामान्य पद्धतीने सामना जिंकला तरी ते जास्तीत जास्त पंजाबच्या वर सरकतील आणि त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. कारण नेटरन रेटच्या जोरावर मुंबई अव्वल चार संघांमध्ये जाणार नाही.

Advertisement

नेट रनरेटमधील तफावत भरुन काढण्यासाठी मुंबईला प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. इतकच नाही तर त्यानंतर त्यांना धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाला तब्बल 171 धावांनी पराभूत करावं लागणार आहे. म्हणजे हे जवळजवळ अशक्य आहे. दिल्ली, चेन्नई, आरसीबी आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई राहणार का आरसीबी याचा निर्णय आज शुक्रवारी होणाऱ्या मॅचनंतर होणार आहे.

मुंबईला आज सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच करावी लागणार आहे. जर त्यांनी नाणेफेक जिंकली नाही आणि त्यांना प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागलं तर धावांचा पाठलाग करुन त्यांना रनरेट सुधारता येणार नाही. सामना कितीही विकेट्स राखून जिंकला तरी त्याचा नेट रनरेटवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग करुन सामना हाती लागला तरी प्लेऑफ गाठता येणार नाही. म्हणूनच नाणेफेक जिंकून 250-300 रन्स करा. गोलंदाजीच्या माऱ्याने प्रतिस्पर्ध्याला 100 धावसंख्येच्या आत गुंडाळा हा एकच पर्याय मुंबईकडे असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement