SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बाॅम्ब ठेवल्याचा फोन.. सासऱ्या-जावयाच्या जोडीचा प्रताप.. असे उलगडले गुढ..

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले राज्यातील मंदिरांचे दार घटस्थापनेला अखेर खुले झाले. मात्र, पहिल्याच घासाला खडा लागला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला नि एकच खळबळ उडाली.

पणजी कंट्रोल रुमला अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा हा फोन आला होता. कोणतीही रिस्क न घेता, बॉम्बशोधक पथकाने मंदिर परिसराचा कानाकोपरा तपासून पाहिला. मात्र, मंदिर परिसरात कुठलाही बॉम्ब वा स्फोटक पदार्थही सापडला नाही. अखेर या प्रकरणाचा झडा लावण्यात पोलिसांना यश आले.

Advertisement

अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा निनावी फोन करणाऱ्या दोन आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. बाळासाहेब कुरणे व सुरेश लोंढे, अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही आरोपी एकमेकांचे सासरा-जावई आहेत.

पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावचे हे दोन्ही आरोपी रहिवासी आहेत. जावयाने दारुच्या नशेत सासऱ्याच्या मोबाईलवरुन अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन केल्याचे समोर आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे.

Advertisement

अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झाल्याने भाविकांसाठी हे मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.

साडेतीन शक्तिपीठापैकी एक असणाऱ्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने मंगळवारी (ता. 6) घटस्थापना झाली. मंदिर समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही तोफेची सलामी दिली. त्यानंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement