SpreadIt News | Digital Newspaper

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी मिळणार? वाचा शासन निर्णय..

0

कोरोना महामारीच्या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ होऊनही प्रत्यक्ष न दिल्याने भत्त्यासह फरकाच्या रकमेच्या प्रतिक्षेत असलेल्या शासकीय व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना राज्य सरकारने दसरा- दिवाळीची चांगलीच भेट दिली आहे. यंदा महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णयात काय?

Advertisement

राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची (DA) रक्‍कम मूळ वेतनाच्या 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा महागाई भत्ता वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून रोखीने देण्यात यावी, असा शासन निर्णय जारी झाला आहे.

केंद्र सरकारने 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता हा 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला होता. त्यानुसार ही वाढ मिळेल. ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून लागू केली जाईल.

Advertisement

तसेच 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या 3 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकी देण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे निर्देश आहेत. या वाढीमध्ये 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 व 1 जानेवारी 2021 पासूनच्या महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आला आहे.

मात्र, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 टक्के इतकाच राहील. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 17 लाख कर्मचाऱ्यांना तसेच साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनादेखील होईल.

Advertisement

राज्य शासकीय कर्मचारी, निवृती वेतन धारक आणि सहाव्या वेतन आयोगानुसारचे निवृत्ती वेतन धारक यांना 12 टक्केवरून 17 टक्के करण्यात आलेली महागाई भत्त्याची वाढीव रक्‍कम तसेच 5 टक्के महागाई भत्त्याची थकबाकी ऑक्टोबर 2021 च्या वेतनासोबत रोखीने द्यावी, असा शासन निर्णय गुरुवारी वित्त विभागाने जारी केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement