SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरबसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन्स, ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा..

ड्रायव्हिंग लायसन्स.. अर्थात वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. हे असे कागदपत्र आहे, जे तुम्हाला देशभरात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्षे वा त्याहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालविल्यास दंड भरावा लागतो.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ‘आरटीओ’च्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. अनेकदा एखाद्या एजंटचे हात ओले करावे लागत होते. मात्र, आता तुम्हाला घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे, तेही अगदी 350 रुपयांत..!

Advertisement

तुम्हालाही स्वत:चे वाहन चालवित प्रवासाचा आनंद लुटायचा असेल आणि त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आता ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

जर तुम्ही पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन्स काढत असाल, तर सुरवातीला तुम्हाला लर्निंग लायसन्स, अर्थात शिकाऊ परवाना दिला जातो. त्यासाठी एक टेस्ट द्यावी लागते. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही शिकाऊ परवान्यासाठी पात्र होता.

Advertisement

लर्निंग लायसन्स मात्र ठराविक काही महिन्यांसाठीच वैध असते. या काळात तुम्हाला गाडी चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल किंवा वाहन चालवायला शिकावे लागेल. लर्निंग लायसन्सच्या दिलेल्या मुदतीत वाहन चालविण्यास शिकून तुम्हाला कायम परवान्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागतो.

लायसन्ससाठी अर्ज कसा करणार..?

Advertisement
  • सर्वप्रथम रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://Parivahan.Gov.In/ वर जा.
  • तुमच्या स्क्रीनवर होम पेज (मुखपृष्ठ) उघडेल. मुख्य पृष्ठावर आपले राज्य निवडा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. त्यानंतर नवीन ड्रायव्हिंग लायसन्सच्या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढील पानावर ड्रायव्हिंग लायसन्सचे टप्पे दिले जातील. तुम्हाला खाली सुरू असलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्हाला शिकाऊ परवाना क्रमांक (Driving Learning license) आणि जन्मतारीख भरावी लागेल आणि OK च्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर अर्ज फॉर्म दिसेल. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाईन फी भरल्यावर सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा.
  • नियुक्तीची वेळ निवडावी लागेल. वेळ आणि दिवस निवडल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी RTO ऑफिसमध्ये हजर राहावे लागेल.
  • तुमची टेस्ट घेण्यात येईल. टेस्ट पास केल्यानंतर तुम्हाला शिकाऊ परवाना (Driving Learning license) 15 दिवसांच्या आत तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement