SpreadIt News | Digital Newspaper

🏏 क्रिकेट: पाकिस्तानचा अजब कारभार, जर्सीवर भारताऐवजी टाकलं ‘तिसऱ्याच’ देशाचं नाव!

0

🏏 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याकडे दोन्ही देशांसह जगाचे लक्ष असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या कित्येक वर्षात मालिका झाली नाही. पण आगामी टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही देश आमने सामने येणार आहेत.

🤝 टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. तर टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना 24 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे.

Advertisement

💁🏻‍♂️ जर्सी आली ट्विटरवर…!

▪️ पाकिस्तानच्या या जर्सीमध्ये त्यांचा कर्णधार बाबर आजमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले असून काही नेटकऱ्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. सर्वच स्तरातून आता यावर प्रतिक्रिया उमटत आहे. पाकिस्तानने त्यांची चिडकी वृत्ती अद्यापही सोडली नसून वर्ल्ड कपच्या जर्सीवर यजमान असणाऱ्या भारताच्या (India 2021) जागी सामने पार पडणार असलेल्या युएईचं (UAE 2021) नाव लिहिलं आहे.

Advertisement

▪️ पाकिस्तान क्रिकेट टीमने त्यांच्या जर्सीवर ‘ICC Men’s T-20 WorldCup India 2021’ ऐवजी ‘ICC Men’s T-20 WorldCup UAE 2021’ असा उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या या हरकतीवर आयसीसी कारवाईही करू शकतो. विशेष म्हणजे इतर सर्व संघानी भारताचं नाव लिहिलं असतानाही पाकिस्तानने अशाप्रकारे भारताचा द्वेष करण्यासाठी हे कृत्य केलं आहे, असं म्हटलं जात आहे.

▪️ अनेक नेटकऱ्यांनी इतर विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघाच्या जर्सीचे फोटोही शेअर केले आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचेही फोटो ट्विटरवर व्हायरल झालेले दिसत असून त्यांच्या जर्सीवर मात्र ‘India 2021’ असा उल्लेख केला गेला आहे. या फोटोंची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

Advertisement

🏆 T-20 WorldCup साठी संघ:

🧢 भारताचा संघ: विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, राखीव खेळाडू, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर

Advertisement

🧢 पाकिस्तानचा संघ: बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement