SpreadIt News | Digital Newspaper

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : कोर्टात वकिलांमध्ये खडाजंगी, न्यायाधिशांना करावा लागला हस्तक्षेप..

0

मुंबई-गोवा क्रूझ पार्टीत ड्रग्ज सापडल्याप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी (ता. 2) रात्री बाॅलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलं होते. या सर्वांना कोर्टाने 7 तारखेपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती.

दरम्यान, एनसीबी कोठडीची मुदत काल (ता. 7) संपल्यावर या सर्व आरोपींना एनसीबी पथकाने पुन्हा कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी कोर्टाने आरोपींचा रवानगी न्यायालयीन कोठडी केली. त्यानंतर लगेच आर्यन खानच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी अर्ज केला होता.

Advertisement

कोर्टात नेमकं काय घडलं..
आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज (ता. 8) सुनावणी झाली. त्यात ‘एनसीबी’कडून अॅड. अनिल सिंग यांनी बाजू मांडली, तर आर्यन खानच्या बाजूने सतीश मानेशिंदे यांनी युक्तीवाद केला. मात्र, सुनावणीच्या वेळी या दोन्ही वकिलांमध्ये मोठी खडाजंगी झाल्याचे समोर येत आहे.

आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅम ड्रग्ज देखील मिळालेले नसल्याने त्याला जामीन मिळावा, असा युक्तीवाद सतीश मानेशिंदे यांनी केला. मानेशिंदे हे आर्यनच्या जामीनासाठी आग्रही होते, तर अनिल सिंग यांनी एनसीबीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

युक्तीवाद करताना सतीश मानशिंदे यांनी रिया चक्रवर्ती हिला देण्यात आलेल्या जामीनाचाही दाखला दिला. ‘या केसमध्ये काहीही जप्त केलेले नसताना, त्याला इतके महत्व का दिले जात आहे,’ असा सवालही त्यांनी केला.

त्यावर अनिल सिंग यांनी म्हटलं की “तुम्ही या प्रकरणात असं म्हणू शकत नाही. सध्या सर्व आरोपी कस्टडीमध्ये असून, त्यातील एखादाही बाहेर गेल्यास या केसवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.”

Advertisement

न्यायाधिशांचा हस्तक्षेप..
एका क्षणाला तर दोन्ही वकिल अक्षरक्ष भांडताना दिसले. ते पाहून अखेर न्यायाधीशांना हस्तक्षेप करावा लागला. “तुम्ही जर माझ्यासमोर असे वाद घालत असाल, तर मी काहीही बोलू शकणार नाही. मला अर्ज मिळाला, तर मी निर्णय घेऊ शकेन,” असे कोर्टाने दोघांनाही बजावले.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement