SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रियांकासोबत काम करणे शाहरुख, अक्षय, सलमान, आमिरने का बंद केले..? जाणून घेण्यासाठी वाचा..

बॉलिवूडची देसी गर्ल म्हटलं की एकच नाव समोर येते, ते म्हणजे.. प्रियांका चोप्रा..! आपल्या पेक्षा १० वर्षांनी लहान असणाऱ्या अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत लग्न करुन प्रियांका अमेरिकेला गेली, पण सोशल मीडियातून सतत ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते..

प्रियांकाने बाॅलिवूड ते हाॅलीवूड असा प्रवास केला आहे. अनेक कलाकारांसोबत काम केलेय. काही अभिनेत्यांसोबत तर तिचे अनेक चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले. मात्र, नंतर ती या अभिनेत्यांसोबत काही दिसली नाही. प्रियांकाच्या बाॅलिवूडमधील या प्रवासाचा घेतलेला आढावा..

Advertisement

अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि प्रियांका यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलेय. बॉलिवूडमधील करियरच्या सुरुवातीला तिने अक्षय कुमारसोबत अनेक हिट दिले. दोघांची जोडी सुपरहिट म्हणून ओळखली जायची.

दरम्यानच्या काळात हे दोघं एकमेकांना डेट करीत असल्याच्या बातम्या आल्या नि संपूर्ण वातावरण बिघडलं. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने प्रियांकासोबत काम करु नकोस, अशी सक्त ताकीदच त्याला दिली. त्यानंतर प्रियांका-अक्षयची जोडी काही चाहत्यांना पुन्हा पडद्यावर दिसली नाही.

Advertisement

शाहरुख खान
शाहरुख खानसोबत प्रियांकाने सलग दोन वर्षे एकत्र काम केले. अवॉर्ड शोचे अँकरिंग असो, वा आयपीएल सामने, हे दोघेही एकत्र दिसत. साहजिकच त्यांच्यात काही तरी सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे शाहरुखची पत्नी गौरी नाराज झाली. त्यानेही प्रियांकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

सलमान खान
सलमानसोबत प्रियांकाने ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. मात्र, नंतर तिने सलमान सोबत ‘मिसेस खन्ना’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्याचा सलमानला राग आला.

Advertisement

सलमानने पुन्हा एका चित्रपटात प्रियांकाला छोट्या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, तेव्हाही तिने नकार दिला. त्यामुळे सलमानने यापुढे प्रियांकाला कोणत्याही चित्रपटासाठी विचारायचे नाही, असे ठरविले.

अनेक वर्षानंतर सलमानने पुन्हा प्रियांकाला ‘भारत’ चित्रपटासाठी विचारले होते, पण अगदी शेवटच्या क्षणी प्रियांकाने हा चित्रपट सोडला. त्यानंतर ते दोघे एकत्र दिसलेले नाहीत.

Advertisement

आमिर खान
प्रियांका आणि आमिरने अजूनपर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. त्यांच्यात काही कारणाने वाद झाल्याचे बोलले जाते. अनेकदा आमिरला प्रियांकाचे नाव सुचविले असता, त्याने स्पष्ट शब्दांत त्यास नकार दिल्याचे समजले.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement