सापाचा दंश करवून सासूची हत्या करणाऱ्या आरोपी सूनेचा जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला. या अजब हत्याकांडाबाबत सुप्रिम कोर्टानेही आश्चर्य व्यक्त केले. न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
नेमकं प्रकरण काय..?
राजस्थानातील ही घटना आहे. जयपूरमधील एका तरुणासोबत 12 डिसेंबर 2018 रोजी आरोपी महिलेचे लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतरही तिचे जयपूरमधील मनीष नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मनिषसोबत ती तास न् तास फोनवर नेहमी बोलत असे.
याबाबत आरोपी महिलेच्या सासू सुबोध देवी यांना खबर लागली. आपल्या विवाहबाह्य संबंधात सासूचा अडसर येत असल्याचे पाहून आरोपी महिला व तिचा प्रियकर मनीष यांनी हत्येचा कट रचला. त्यानुसार, 2 जून 2019 रोजी सुबोध देवी यांच्या खोलीत विषारी साप सोडून दिला.
सापाच्या दंशाने सुबोध देवी यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर दीड महिन्यांनी आपल्या सूनेची तिच्या सासऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कुटुंबाने या प्रेमीयुगुलामध्ये झालेल्या संभाषणाची माहितीही दिली.
दरम्यान, तेथील पोलिसांनी सर्व आरोपींना 4 जानेवारी 2020 रोजी अटक केली. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. आरोपी सूनेने सुप्रिम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने या सूनेचा जामिनअर्ज फेटाळून लावला.
कोर्टाने काय म्हटलंय…
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं, की “विषारी साप आणणं आणि त्याच्या साहाय्याने हत्या घडवून आणण्याचा नवाच ट्रेंड आला आहे. राजस्थानमध्ये तर आता हे नेहमीचंच झालंय.”
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511