SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर..! आता ‘मलेरिया’वर आली लस, WHO ने दिली मंजुरी

देशात डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्युच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पहायला मिळाली. आता याला आटोक्यात आणण्यासाठी मलेरिया लसीला मान्यता देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) बुधवारी RTS, S/AS01 मलेरिया लसीला (Malaria Vaccine) मान्यता दिली आहे. आफ्रिकेतील घाना, केनिया आणि मलावीमध्ये 2019 पासून पायलट प्रोग्रामच्या माध्यमातून लहान मुलांना मलेरिया लसीचे डोस देण्यात आले.

Advertisement

ज्यामध्ये लसीचे दोन दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले होते. याचा चांगला प्रभाव लक्षात घेतल्यानंतर मलेरियाच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राप्त माहीतीनुसार, आफ्रिकेसह जगभरात वर्षाला जवळपास 400000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा मलेरियामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

सहारन अफ्रिकेत मलेरियाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. या आजारामुळे तरुण मुलांचा सर्वाधिक बळी गेला आहे. GSK या कंपनीने 1987 मध्ये प्रथम औषध बनवले होते. RTS,S/AS01 या नावाने ही लस ओळखली जाणार आहे.

GSK फार्मा कंपनीने ही लस विकसित केली आहे. चाचणीनंतर आफ्रिकेत आधी लस देण्यात आली. त्यात मलेरियाचे गंभीर परिणाम 30% पर्यंत कमी करण्यात ही लस प्रभावी असल्याचं आढळून आलं. चार डोसमध्ये ही लस देण्यात येणार आहे. घाना, केनिया आणि मलावीने या लसीचा वापर सुरु केला आहे.

Advertisement