SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏆 IPL 2021: विराट कोहलीच्या टीमचं क्वालिफायर-1 गाठणं सीएसकेवर अवलंबून? नेमकं कसं जाणून घ्या..

 

🏏 इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या प्ले-ऑफमधील चौथी पोझिशन मिळवण्याकरता चुरस सुरू असताना आता टॉप-2 मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी लढत सुरू आहे. काल (ता.6) झालेल्या सामन्यात जर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला असता तर ही स्पर्धा अधिक चुरशीची झाली असती आणि गणित काहीतरी वेगळं झालं असतं.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏆 IPL ची खरी मजा Howzat सोबतच.!

Advertisement

💰 आजच HowZat वर रजिस्टर करा, स्वतःची टिम बनवा आणि कमवा 3000 रुपये वेलकम बोनस.

🤝 रजिस्टर करण्यासाठी क्लिक करा https://bit.ly/3B7wFKm

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🧐 कालच्या सामन्यात काय झालं?

Advertisement

⚾ चुरशीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं (SRH) प्रथम फलंदाजी करताना 7 गडी बाद 141 धावा जमवल्या. जेसन रॉयच्या 44, केन विलियम्सनच्या 31 धावांचा मोलाचा वाटा यात मोठी धावसंख्या उभारण्यास फलदायी ठरला. RCBकडून हर्षल पटेलच्या 3, तर डॅन ख्रिस्टियनने घेतलेल्या 2 विकेट्स महत्वाच्या ठरल्या.

⚾ प्रत्युतर देताना RCBकडून देवदत्त पडिक्कलने (41) व ग्लेन मॅक्सवेलने (40) यांनी शानदार खेळ दाखवला. पण, केननं 15व्या षटकात मॅक्सवेलला धावबाद करून सामना जागीच फिरवला. शेवटच्या 2 षटकांत सामना कोण जिंकेल हे अवघड बनत चाललं होतं.

Advertisement

⚾ पण अखेरच्या षटकात बँगलोरला विजयासाठी 13 धावांची गरज असताना एबी डिव्हिलियर्सनं 4 निर्धाव चेंडू खेळले अन् भुवनेश्वर कुमारनं SRH ला 4 धावांनी विजय मिळवून दिला आणि RCB ला 6 बाद 137 धावांवरच रोखलं. केनला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळाला. मॅक्सवेलची विकेट हा टर्निंग पॉईंट ठरल्याचे विराट कोहलीनंही मान्य केलं.

✌️ RCB ला आता विजयाची आस.!

Advertisement

काल झालेल्या सामन्यात RCBनं जर विजय मिळवला असता तर त्यांचे 18 गुण झाले असते आणि नेट रन रेटही चांगला झाला असता. मग नंतरच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला ते क्वालिफायर-1 साठी सहज पात्र ठरू शकले असते.

📍 पण, आता त्यांना दिल्लीवर विजय मिळवावा तर लागेल, शिवाय चेन्नईच्या पराभवाचीही बँगलोरला वाट पाहावी लागेल. चेन्नई 18 गुण व +0.739 नेट रन रेटसह दुसऱ्या,तर बंगलोर 16 गुण व -0.159 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चेन्नईचा अखेरचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध आज, तर RCBचा दिल्लीविरुद्ध उद्या होईल. त्यामुळे आज चेन्नई जिंकल्यास विराटचे क्वालिफायर-1 खेळण्याचे स्वप्नही धुळीस मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement