SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. सकाळी पैसे येणे चांगलं राहील.

Advertisement

वृषभ (Taurus) : पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते. आज आराम करावासा वाटेल.

मिथुन (Gemini) : गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका.

Advertisement

कर्क (Cancer): तब्बेत चांगली राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. खेळताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.

सिंह (Leo) : चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. कौटुंबिक शांतता बाळगावी. आज फिरायला जाण्याचं टाळा.

Advertisement

कन्या (Virgo): पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. तब्येतीची काळजी घ्या.

तूळ (Libra) : व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. शुभवार्ता समजेल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल. पैसे हातातून लवकर सुटेनासे होतील.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. मिळून-मिसळून वागावं वाटेल.

धनु (Sagittarius) : सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. दिवस छान जाईल.

Advertisement

मकर (Capricorn) : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. आपलेच आपल्याला खाली ओढतील.

कुंभ (Aquarius) : . खर्चाचे प्रमाण वाढेल. भागीदारीत खुश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत. आज विशेष विचारपूस होईल.

Advertisement

मीन (Pisces) : काही गोष्टी अधिकार वाणीने सांगाव्यात. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. आज कोणाकडून रक्कम स्वीकारु नका. व्यायाम सुरू कराल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement