कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांचे दारे उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उद्यापासून (ता. ७) उघडली जाणार आहेत. मात्र, देव दर्शन घेण्यापूर्वी भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
शिर्डीचे साईबाबा मंदिर
साईमंदिरात रोज 15,000 भक्तच दर्शन घेऊ शकतील. दर्शनासाठी ऑनलाईन पास दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षांखालील मुले आणि गर्भवतींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक, अन्यथा RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल. प्रसादालय सध्या बंद असेल.
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
दर्शनासाठी अॅपवरून बुकिंग करावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, मुले आणि गर्भवती महिलांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे. दर्शनासाठी भक्त पुढील लिंकवर बुकिंग करु शकतात. https://play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt
दर गुरुवारी दुपारी 12 वाजता ट्रस्टद्वारे दर्शनासाठी क्यूआर कोड जारी केला जाईल. दर तासाला 250 भाविक दर्शनासाठी बुकिंग करु शकतील. प्रवेशासाठी फक्त ऑनलाईन बुकिंग केले जाईल.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर
भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले असेल. रोज 10 हजार भाविक मुखदर्शन घेऊ शकतील. त्यासाठी 5 हजार भाविक ऑनलाईन पासद्वारे, तर 5 हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळेल. फुलं, हार आणि प्रसाद नेण्यास मनाई आहे.
आई रेणुकेचा माहूर गडही सज्ज
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर येथील रेणूका मातेच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. दोन वर्षानंतर गडावर यात्रा भरणार असल्याने प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली जात आहे.
तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. कोजागिरी पौर्णिमा उत्सव रद्द. या काळात 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान भाविकांना जिल्हा बंदी असेल.
कोल्हापूरची अंबाबाई मंदिर
मंदिराच्या चार पैकी केवळ एकच दरवाजा भाविकांसाठी खुला असेल. भक्तांच्या संख्येवरही मर्यादा व मास्कची सक्ती असेल. सर्वांचे थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. खण, ओटी साहित्यावर निर्बंध असतील. थेट गाभाऱ्यात प्रवेश न देता, पितळी उंबऱ्यापासून दर्शन देण्याचा विचार सुरू आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511