SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला, नवे दर आजपासून लागू..!

भारतीय सध्या पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे त्रस्त आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे व कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. आता यामध्ये भर पडतेय ती म्हणजे गॅस सिलिंडरच्या दरवाढीची! स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात पुन्हा वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर किती महाग?

Advertisement

देशात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आज बुधवार, 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरचे हे नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतकी झाली आहे. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे, तर 5 किलो सिलिंडरची नवीन किंमत आता 502 रुपये झाली आहे. चेन्नईत सिलेंडर दर 900.50 रुपयांवरुन 915.50 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 911 रुपयांवरून 926 रुपये झाली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा (LPG) भाव वाढवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचे दर 43.5 रुपयांनी वाढले आणि त्यामुळे 19 kg च्याव्यावसायिक सिलिंडरसाठी 1736.50 रुपये आता भरावे लागणार आहेत. याचा थेट फटका हॉटेल-रेस्टॉरंटचालकांना बसणार आहे.

‘या’ वर्षात अशी झाली दरवाढ

Advertisement

पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. जुलै महिन्यातही 25 रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement