SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीने दिले आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत, फेअरवेलचा सामना ‘या’ मैदानावर खेळणार..!

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी अजूनही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करतोय. हा हंगाम संपल्यानंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा होती. मात्र, खुद्द धोनीनेच याबाबत खुलासा केलाय.

युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज चांगली कामगिरी करतेय. त्याच्या कप्तानीचा संघाला मोठा फायदा होत आहे. चेन्नईला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून दिल्यावर धोनी कदाचित आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचे बोलले जात होते.

Advertisement

दरम्यान, आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. एका ऑनलाइन कार्यक्रमात स्वत: धोनीने भारतीय चाहत्यांच्या साक्षीने आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आयपीएलचा पुढचा हंगामही तो मैदानात खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झालेय.

Advertisement

इंडिया सिमेंट्सला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना धोनी म्हणाला, की “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्टला निवृत्ती घेणे अप्रतिम होते. आयपीएल निवृत्तीबाबत विचाराल, तर तुम्ही माझा सामना पाहण्यासाठी येऊ शकता. यासाठी मी तुम्हाला काही वेळ देईल.”

या वेळी त्याने फेअरवेलचा सामना चेन्नईच्या मैदानात चाहत्यांच्या उपस्थितीत खेळायला आवडेल, असे म्हटले. मला थांबायचे असेल, त्यावेळी तुम्ही मला चेन्नईच्या मैदानात खेळताना पाहू शकता. चेन्नईमध्येच अखेरचा सामना खेळेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Advertisement

डीआरएसबाबत…
डीआरएसबाबत धोनी म्हणाला, की “पंचांच्या चुका सुधारण्यासाठी डीआरएस आणला गेला. मी यामध्ये गोलंदाजाची भूमिका पाहतो. फलंदाज बाद आहे, तू रिव्हू घे, असे बाॅलर म्हटला, तर मी क्रॉसचेक करतो. त्याला पुन्हा विचारतो की, खरच असे आहे का?”

चेन्नईच्या कामगिरीबाबत..
आयपीएलमधील चेन्नईच्या कामगिरीबाबत तो म्हणाला, की आम्ही प्रत्येक हंगामात चांगला सराव करतो. योजनेप्रमाणे काम केल्यास यश नक्की मिळते. एकदा अपयशी ठरल्यावर तुम्ही दुसऱ्यांदा तीच चूक करू शकत नाही. पराभवातून तुम्ही खूप काही शिकू शकता.”

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement