SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : आज दिवसभर कार्यरत राहाल. बोलण्यात मधाळपणा बाळगावा. व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल.

Advertisement

वृषभ (Taurus) : कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. गणपतीची उपासना करा. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल. गोड बोलून सर्व कामे करून घ्या. सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

कर्क (Cancer): फटकळ बोलण्याने नुकसान होणार नाही याचे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर विश्वास ठेवावा. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा.

सिंह (Leo) : आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे. अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. दिवस अनुकूल जाईल. संततीविषयी चिंता लागून राहील.

Advertisement

कन्या (Virgo): सट्टा-शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. चातुर्य दर्शवाल.

तूळ (Libra) : वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. हलका आहार घ्यावा.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : आध्यात्मिक प्रगती करता येईल. मातेविषयी चिंता राहील. विरोधकांचा त्रास कमी होईल. मित्रांची मदत होईल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका.

धनु (Sagittarius) : स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शक्य असेल तर प्रवास टाळा. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

Advertisement

मकर (Capricorn) : समाधानी दिवस असेल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. आर्थिक भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. घरगुती कामे जलद गतीने पार पडतील.

कुंभ (Aquarius) : नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. आळस झटकून कामाला लागावे.

Advertisement

मीन (Pisces) : दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते. हातून सेवा घडेल.

➖➖➖➖➖➖➖
[ 📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511]

Advertisement