SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏦 बँक करतेय लिलाव! तुम्हालाही स्वस्तात घर, दुकान खरेदी करायचं असेल, तर वाचा..

🏠 जर तुम्हालाही महागडं घर, दुकान किंवा जमीन स्वस्तात खरेदी करायची असेल तर बँक ऑफ बडोदा कोणत्याही ब्रोकरेजशिवाय स्वस्तात घर, जमीन, दुकान खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. बँक ऑफ बडोदाने डिफॉल्ट लिस्टमधील मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

🤔 लिलाव कधी पार पडणार?

Advertisement

बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून लिहिले आहे की मेगा ई-लिलाव 08 ऑक्टोबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. येत्या 8 ऑक्टोबरला लिलाव प्रक्रियेला सुरुवात होत आहे. आपण येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

💁🏻‍♂️ लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी…

Advertisement

इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी गुगलवर ‘ibapi’असं सर्च करून पहिल्या क्रमांकावर आलेल्या संबंधित वेबसाईटवर पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे नोंदणी करा.

🏬 बँकेकडून कोणत्या मालमत्तेचा लिलाव होतो?

Advertisement

📌 बँक कोणत्या व कुठल्या मालमत्तांचा लिलाव करतेय, याची संपूर्ण माहीती गुगलवर 👉 ‘bankofbaroda E-auction’असं सर्च करा मग तुम्हाला Bank of Baroda ची वेबसाईट दिसेल, तिथं क्लिक करा आणि E-auction विषयी अधिक माहीती घ्या.

📌 ज्या लोकांना कर्जाच्या रूपात पैसे देते, त्याकरिता हमी म्हणून त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेऊन घेते. जर कर्जदार कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा परिस्थितीत बँक दिलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्याच्या तारण मालमत्तेचा लिलाव करते. याबाबत बँकेच्या संबंधित शाखा वर्तमानपत्र आणि अन्य माध्यमांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करतात.

Advertisement

📍 E-auction मध्ये सहभागी कसं व्हायचं?

ई लिलावात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टीची अनामत रक्कम जमा करावी लागेल. संबंधित बँक शाखेत ‘केवायसी डॉक्युमेंट्स’ दाखवावे लागतील. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजीटल सिग्नेचर आवश्यक आहे. तुम्हाला ई लिलावामध्ये अन्य अधिकृत एजन्सीद्वारेही सहभागी होता येईल. संबंधित बँक शाखेत रक्कम जमा करुन, तुमची कागदपत्र दाखवल्यानंतर, तुमच्या अधिकृत ई मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. नियमावली पाळून तुम्ही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement