SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्यन शिप विकत घेऊ शकतो, त्याला ड्रग्ज विकण्याची काय गरज…? आर्यनच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद..

समुद्रातील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी (ता. 2) रात्री बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे.

मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला.

Advertisement

आर्यन खानच्या फोनमधून काही आक्षेपार्ह गोष्टी, ड्रग्ज चॅट्स जप्त केल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. त्यावर आर्यनचे वकिल मानशिंदे यांनी एकामागून एक युक्तिवाद सादर केले. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नाहीत. तसेच त्याच्याकडे बोर्डिंग पासही नव्हता.

आर्यनला पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे तो गेला. त्याची बॅग चेक केली असता, त्यात काहीही आक्षेपार्ह सापडलेले नाही. त्याचा मित्र अरबाजकडे 6 ग्रॅम चरस, तर दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं. त्याच्याशी आर्यनचा संबंध नसल्याचे मानेशिंदे म्हणाले.

Advertisement

आर्यन शिप विकत घेऊ शकतो..
ते पुढे म्हणाले, की आर्यनला शिपमध्ये ड्रग्ज विकण्याची काहीही गरज नाही. आर्यनला हवे असल्यास तो संपूर्ण शिप विकत घेऊ शकतो. त्याच्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटमध्येही काहीच आढळलं नाही. केवळ तपासासाठीच आर्यनवर हे आरोप लावले असून, त्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेय.

न्यायालयात तब्बल अडीच तास युक्तिवाद सुरु होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा यांच्यासह अन्य आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत ‘एनसीबी’ कोठडी सुनावली. या तिघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement