SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛕 घटस्थापना: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा, रंगांचं महत्व, स्त्रियांनी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी? जाणून घ्या..

💁‍♀️ नवरात्रीचा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच गरबा खेळण्याचे वेध लागले आहेत. मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यास सशर्त परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा नवरात्री आनंदात पार पडणार असल्याचं दिसतंय.

👉 आश्विन शुद्ध प्रतिपदा यंदा 7 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. नवरात्रीच्या 9 दिवशी देवीला नऊ रंगाच्या साड्या घालण्याची प्रथा असते. नऊ दिवसांपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. तसेच, यावर्षी तृतीया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा केली जाणार आहे, म्हणून यावर्षी नवरात्रौत्सव 9 ऐवजी 8 दिवसांचा आहे.

Advertisement

🥻 कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करतात व कोणत्या रंगाची साडी घालतात, माहीत करून घ्या..

▪️ 7 ऑक्टोबर: रंग-पिवळा: पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीला पिवळ्या रंगांची साडी नेसवून तिची पूजा-अर्चना केली जाते. पिवळा रंग हा आनंदाचे प्रतिक म्हणुन ओळखला जातो. हा रंग आपल्याला आशेची किरण दाखवतो आणि पिवळा रंग सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त करून देत असतो.

Advertisement

▪️ 8 ऑक्टोबर: रंग-हिरवा: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची हिरव्या रंगांची साडी नेसवून पूजा केली जाते. हिरवा रंग हा हिरव्या हिरवळीचे, समृदधीचे तसेच भरभराटीचे प्रतीक देखील मानले जाते. तसेच पाहायला गेले तर हिरवा रंग हा निसर्गाचाही रंग आहे.

▪️ 9 ऑक्टोबर: रंग- राखाडी: तिसऱ्या दिवशी राखाडी रंगांची साडी नेसवून चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. हा रंग आपल्याला गौरव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो. तसेच त्यात वाढ देखील करीत असतो.असे म्हटले जाते की ह्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला देवीचे मार्गर्दर्शन प्राप्त होत असते.

Advertisement

▪️ 10 ऑक्टोबर रंग-नारंगी: नवरात्रीमध्ये चौथ्या दिवशी दुर्गामातेचे चौथे रुप कुष्मांडाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला नारंगी रंगांची साडी नेसवली जाते. नारंगी रंग हा आनंद आणि उर्जा या दोघांची सुचना देणारा रंग म्हणुन ओळखला जातो.

▪️ 11 ऑक्टोबर: रंग-पांढरा: नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी दुर्गामातेचे पाचवे रुप स्कंदमाताची पुजा केली जाते. यादिवशी देवीला पांढऱ्या रंगांची साडी नेसवली जाते. एखाद्या मंगलप्रसंगी सुदधा पांढरा पोशाख परिधान केला जात असतो. शुद्धता आणि पवित्रतेसोबतच पांढरा रंग हा शांती, विश्वास आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणुन देखील ओळखला जातो.

Advertisement

▪️ 12 ऑक्टोबर: रंग-लाल: नवरात्रीमध्ये सहाव्या दिवशी देवीला लाल रंगांची साडी नेसवली जाते आणि कात्यायनी देवीची पूजा केली जाते. लाल रंग हा तीव्रता तसेच उत्साह दर्शवण्याचे काम करत असतो. सुवासिनी स्त्रिया कपाळाला लावतात त्या कुंकुचा रंग देखील लालच असतो. लाल रंग हा देवीचा अत्यंत आवडीचा रंग म्हणुन ओळखला जातो.

▪️ 13 ऑक्टोबर: रंग-गडद निळा: सातव्या दिवशी कालरात्रीच्या रुपाची पूजा केली जाते. यादिवशी देवीला निळ्या रंगांची साडी नेसवली जाते. निळा रंग दृढ विश्वासाचे प्रतीक मानला जातो. निळा रंग हा स्वतामधील दडलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला जाणीव करून देण्याचे काम देखील निळा रंग करतो.

Advertisement

▪️ 14 ऑक्टोबर: रंग-गुलाबी: आठवा दिवस महागौरीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सार्वभौमिक प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतिक म्हणुन मानला जाणारा रंग आहे. यादिवशी देवीला गुलाबी रंगांची साडी नेसवली जाते.

▪️ 15 ऑक्टोबर: रंग-जांभळा: नववा दिवस आई भवानीची पूजा केली जाते. यादिवशी देवीला जांभळ्या रंगांची साडी नेसवली जाते. जांभळा रंग हा राजेशाही थाटामाटाचा तसेच स्थिरतेचे प्रतीक म्हणुन ओळखला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement