SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमेझाॅन की फ्लिपकार्ट, कोणत्या सेलमध्ये मिळेल चांगला स्मार्टफोन, लेटेस्ट फोनचे जबरदस्त पर्याय इथे वाचा..!

देशातील दोन मोठ्या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट.. अमेझाॅनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’, तर फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डे सेल’ सुरु झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इतर अनेक प्रॉडक्ट कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.

फेस्टिव्ह सीजनमध्ये या दोन्ही प्लॅटफाॅर्मवर विविध सवलतींसह  कॅशबॅक ऑफर, नो कॉस्ट ईएमआय सारख्या सुविधाही मिळत आहेत. त्यामुळे खरे तर ग्राहकांसाठी खरेदीची पर्वणीच आली आहे. कालपासून (ता. 3) हा सेल सुरु झाला असून, तो 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

Advertisement

या सेलमध्ये सर्वांत जास्त काय विकले जात असेल, तर ते म्हणजे स्मार्टफोन्स.. वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळ्या फीचर्ससह स्मार्टफोन्स या सेलमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी एकाच वेळी सेल सुरु झाल्याने ग्राहकही संभ्रमात पडले आहेत.

नेमका कोणता फोन घ्यावा, कोणत्या फोनमध्ये कोणते फीचर्स आहेत, लेटेस्ट फोन कोणता, कोणत्या ठिकाणी तो स्वस्त मिळेल, याची माहिती लवकर समजत नसल्याने अनेकांचा गोंधळ उडाल्याचे दिसते. चला तर मग या सेलमध्ये जबरदस्त फीचर्ससह आलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

ओप्पो-A74 5G
भारतात याच वर्षी ओप्पो-A74 5G हा स्मार्टफोन लाँच झाला.
सेलमधील किंमत- 14,490 रुपये (एचडीएफसी बँकेच्या ऑफरचाही लाभ घेता येईल)
रॅम- 6 GB
इंटरनल स्टोअरेज-128 GB

बॅटरी- 5000 mAh
18 वॅट फास्ट चार्जर
डिस्प्ले-  6.49 इंच फुल HD+ पंच होल
साइड फिंगरप्रिंट स्कॅनर
कॅमेरा- 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.

Advertisement

सॅमसंग गॅलेक्सी- M32-5G
सॅमसंग कंपनीने ऑगस्टमध्ये हा स्मार्टफोन भारतात लाँच केला. हा फोन 5G 12 बँडसह असून, अॅमेझॉनवर बेस्ट ऑफरअंतर्गत तो 14,499 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. मीडियाटेक 720 डायमेंसिटी प्रोसेसर असणारा हा भारतातील पहिला फोन आहे.

डिस्प्ले- 6.5 इंची टीएफटी
बॅटरी- 5000 mAh
क्वाड कॅमरा सेटअप- प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल, फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल
6 GB रॅम आणि स्टोअरेज- 128 GB.

Advertisement

रेडमी नोट प्रो-मॅक्स (Redmi Note Pro Max)
मार्च 2021 मध्ये Xiaomi कंपनीच्या रेडमी ब्रँडने रेडमी नोट 10 सीरिज लाँच केली. त्या अंतर्गत रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हे टॉप एंड वेरिएंटही लाँच केले होते.

किंमत- 18,999 रुपये (एचडीएफसी बँक ऑफरमध्ये- 17,499 रुपये)
कॅमेरा- 108 मेगापिक्सल
रॅम- 6 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेज
बॅटरी- 5020mAh

Advertisement

रेडमी 9 Active
किंमत- अॅमेझॉनवर 9,499 रुपये
डिस्प्ले – 6.53 इंची HD+
बॅटरी- 5000 mAh
प्रोसेसर – हेलियो G35 ऑक्टाकोअर

Advertisement