SpreadIt News | Digital Newspaper

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ‘खेला होबे’, ममता बॅनर्जी यांचा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय..

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळविला. त्यांनी भाजप उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांचा तब्बल 58 हजार 832 मतांनी पराभव केला.

विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता खेचून आणण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. त्यानंतर त्याच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या होत्या.

Advertisement

दरम्यान, ममता दीदी मुख्यमंत्री पदी बसल्या असल्या, तरी 6 महिन्यांत त्यांना निवडून येणं गरजेचं होते. ममता यांच्यासाठी भवानीपूर मतदारसंघातील आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 58 हजार 832 मतांनी ममता दीदींनी विजय मिळविला.

या विजयासह भवानीपूर मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक ममता दीदींनी केलीय. भवानीपूर मतदारसंघातून यापूर्वी ममता यांनी दोन वेळा विजय मिळविला होता.

Advertisement

पराभव स्वीकारला – प्रियांका टिब्रेवाल
पराभवानंतर भाजप उमेदवार प्रियांका टिब्रेवाल म्हणाल्या, की “मी पराभवाचा स्वीकार करते. मी न्यायालयात जाणार नाही. मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली, ते सर्वांनीच पाहिले आहे.”

मतांची आकडेवारी
ममता बॅनर्जी (तृणमुल काॅंग्रेस)- 84709 मते
प्रियांका टिब्रेवाल (भाजप) – 26320 मते
श्रीजीब (सीपीएम)- 4201 मते

Advertisement

विरोधकांचा चेहरा होणार
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या विजयामुळे राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान अधिक गडद होणार आहे. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा त्या चेहरा बनू शकतात. विरोधकांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या विजयामुळे अधिक गती येणार असल्याचे बोलले जाते.

गोव्यात जल्लोष
ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ममता यांच्या विजयामुळे गोव्यात तृणमूल काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे. गोव्यात ममता दीदींचे पोस्टर झळकले आहेत. पणजी विमानतळ परिसरात तृणमूल कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं.

Advertisement