सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या बहुराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट कंपनीत पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या फ्रेशर्ससाठी मायक्रोसाॅफ्ट कंपनीत मोठी भरती होत आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीत कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, त्यासाठी अर्ज कसा करणार, उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असणार, याबाबत जाणून घेऊ या..
कोणत्या पदासाठी भरती
– ग्रॅज्युएट फ्रेशर्स (Graduate Freshers)
पात्रता
– उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक.
– उमेदवाराला संबंधित पदाविषयी माहिती असायला हवी.
– संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
– निरनिराळ्या शिफ्ट्समध्ये काम करण्याची तयारी हवी.
– उमेदवाराकडे इंग्रजीचे ज्ञान असावे.
– कम्युनिकेशन स्किल्स, इंग्रजी बोलण्याचा-लिहिण्याचा अनुभव असावा.
– उमेदवारास गणिताचे चांगलं ज्ञान असावे.
– दहावीपासूनचे शिक्षण चांगल्या गुणांसह असल्यास प्राधान्य.
अशी होणार निवड प्रक्रिया
– सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार.
– नंतर उमेदवारांचा टेक्निकल राउंड होणार आहे.
– निवड झालेल्या उमेदवारांचा एचआर राउंड होईल.
अर्ज कसा करणार..?
– सुरुवातीला www.microsoft.com या वेबसाईटवर जा.
– पेजच्या खाली Job Search वर क्लिक करा.
– नंतर तुमचा देश निवडा.
– Microsoft Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा.
– तेथे सर्व माहिती भरुन Submit करा.