SpreadIt News | Digital Newspaper

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, हाॅटेलमधील जेवण महागण्याची शक्यता..!

0

इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण झालेले असताना, पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी (ता. 1) पुन्हा एकदा गॅस दरवाढीचा झटका दिला. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 43.5 रुपयांची वाढ केली. त्यामुळे हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती. मे-जूनमध्ये हे दर कायम राहिले. जुलै-ऑगस्टमध्ये व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली. सप्टेंबरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपये वाढ केली होती.

Advertisement

पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. त्यानुसार, आता कमर्शियल गॅसचे दर वाढले असले, तरी घरगुती 14. 2 किलो सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कमर्शियल गॅसचे (19 किलाे) दर
▪️ दिल्ली- 1736.5 रुपये. आधीची किंमत 1693 रुपये
▪️ कोलकत्ता- 1805.5 रुपये, आधीची किंमत 1770.5 रुपये
(इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार)

Advertisement

सीएनजी, पीएनजीचे दर वाढणार
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमतीत 60 ते 70 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएनजी व पीएनजी दरात 10 ते 15 टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे गॅसवरील वाहने चालविणे महागणार आहे.

Advertisement