SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दूरदर्शनचा अँटेना हद्दपार होणार? आता सरकारचा ‘हा’ प्लॅन..!

आजच्या डिजिटल आणि उपग्रहांकित युगात कालबाह्य यंत्रणा असलेली देशभरातील दूरदर्शनची 510 लघु व उच्चशक्ती (एलपीटी-एचपीटी) प्रक्षेपण केंद्रे बंद होणार आहेत. या संदर्भातील आदेश प्रसारभारती दूरदर्शन महानिदेशालयाने काढले आहेत.

दूरदर्शनच्या चॅनल्सच्या प्रसारणाचं काय?

Advertisement

▪️ ही केंद्रे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत, 31 डिसेंबर 2021 पर्यंत, 31 मार्च 2022 पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे.

▪️ या केंद्रांच्या ठिकाणची डीडी अ‍ॅनॉलॉग टेरेस्ट्रिअल टीव्ही ट्रान्समीटर (ATT) यंत्रणा असून आधुनिक डिजिटल, उपग्रहांकित माध्यमांच्या (सॅटेलाइट) तुलनेत जुनी, कालबाह्य झालेली आहे.

Advertisement

▪️ दूरदर्शनच्या DD National, DD Bharati यांसारख्या चॅनल्सचे अँटेनाच्या साहाय्याने प्रसारण होत असता आता डिटीएच प्लॅटफॉर्मवरही या चॅनल्ससहित इतर चॅनल्सचेही प्रसारण होत असून रिले केंद्र बंद करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. त्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

बंद होणाऱ्या केंद्रांमध्ये कोणाचा समावेश?

Advertisement

बंद होणाऱ्या केंद्रांमध्ये औरंगाबाद केंद्रांतर्गत येत असलेले सटाणा, जालना, तसेच महाराष्ट्रातील अकोला, अचलपूर, अंबाजोगाईजवळील पिंपळा, कोल्हापूरअंतर्गतचे चिपळूण, देवरुख, राजापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, बीड, अहमदनगर, बुलडाणा आदी केंद्रांचा समावेश आहे. तसेच असेही म्हटले जात आहे की, दूरदर्शनचे (Doordarshan) सर्व चॅनल्स डीडी फ्री डिशवर मोफत उपलब्ध होणार आहे.

प्रसार भारतीकडून मिळाली महत्वाची माहीती

Advertisement

प्रसार भारतीने अप्रासंगिक ठरलेली दूरदर्शनची सर्व 1 हजार 300 रिले (Relay Canter) केंद्रे बंद करण्याचे ठरवले आहे. दूरदर्शन आधुनिकीकरण योजनेंतर्गत 900 रिले केंद्रे आधीच बंद झाली आहेत. उर्वरित 400 केंद्रे पुढील वर्षात मार्चपर्यंत बंद होतील. राष्ट्राच्या द़ृष्टीने महत्त्वाचे विषय आणि धोरणांतून आवश्यक असलेले संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे नवे व्यासपीठ मोलाचे ठरेल. ते लवकरात लवकर सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement