SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओचे हेलपाटे बंद, या संस्था देणार आता परवाना..!

ड्रायव्हिंग लायसन्स, अर्थात वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. हा परवाना काढण्यासाठी ‘आरटीओ’ कार्यालयात खेटे घालावे लागत होते. अनेकदा एजंटचे हात ओले करुनही लवकर काम होत नव्हते. मात्र, आता नो टेन्शन..! कारण, आता ‘आरटीओ’चा उंबरा न झिजवताही ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ मिळणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे अधिकार काही संस्थांना दिले आहेत. या संस्था तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात.

Advertisement

अर्थात ‘आरटीओ’तूनही लायसन्स मिळेल, पण ‘आरटीओ’चा व्याप कमी करण्यात येणार आहे. गाड्यांच्या ‘आरसी’साठी मात्र ‘आरटीओ’ कार्यालयातच जावे लागेल.

या संस्था देणार लायसन्स

Advertisement
  • नवीन नियमानुसार वैध संस्था, कंपन्या
  • एनजीओ
  • ऑटोमोबाईल असोसिएशन
  • वाहन निर्माता संघ
  • वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्र

संस्थांचा रेकॉर्ड स्वच्छ हवा
ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकार मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांकडे केंद्रीय मोटर वाहन नियम 1989नुसार आवश्यक जमीन आणि आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या स्थापनेनंबर स्वच्छ रेकॉर्ड असायला हवे. त्यांना स्वत:च्या जागेत ट्रॅक बांधावा लागेल.

अटी पूर्ण करणाऱ्या संस्थांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला या संस्थांकडे अर्ज करावा लागेल. तेथे सर्व चाचण्या पास झाल्यावर लायसन्स मिळणार आहे.

Advertisement