SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोस्टाच्या बचत खात्यावरील व्यवहाराबाबतच्या नियमांत बदल, ग्राहकांवर भार..

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पोस्टाने त्यांच्या ‘सेव्हिंग अकाउंट’ संदर्भातील नियमांत काही बदल केले आहेत. हे नवे नियम उद्यापासूनच (1 ऑक्टोबर) लागू होणार असून, त्यामुळे खातेदारांच्या खिशावर भार पडणार आहे.

पोस्ट ऑफिसने सेव्हिंग अकाउंटबाबत केलेल्या नवीन नियमांबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

एटीएम मेंटेनन्स चार्ज
पोस्ट ऑफिसच्या एटीएम / डेबिट कार्डावरील वार्षिक मेंटेनन्स शुल्क आता 125 रुपये+जीएसटी असेल. हे नवे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत लागू असेल.

मेसेज अलर्ट शुल्क
खातेदारांना पाठविण्यात येणाऱ्या एसएमएस अलर्टसाठी 12+जीएसटी इतके शुल्क आकारले जाणार आहे.

Advertisement

नव्या एटीएमसाठीचे शुल्क
एटीएम कार्ड हरविल्यास दुसरे डेबिट कार्ड मिळविण्यासाठी 300 रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागेल. नवीन एटीएम पिनसाठीही ग्राहकांना 50 रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागणार आहे.

मिनिमम बॅलन्स
पोस्टाच्या बचत खात्यात ग्राहकाला किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे. बचत खात्यात शिल्लक नसल्यामुळे एटीएम किंवा पीओएस व्यवहार नाकारल्यास खातेदाराला त्यासाठी 20 रुपये + जीएसटी द्यावे लागेल.

Advertisement

मोफत व्यवहारांवर मर्यादा
बचत खात्यातून एका महिन्यात करण्यात येणाऱ्या 5 व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, नंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 10 रुपये+जीएसटी भरावी लागेल.

Advertisement