SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😳 महाराष्ट्रातल्या लोखंडेंची ‘लोखंडी खुर्ची’ इंग्लंडमध्ये गेली कशी? जाणून घ्या रंजक गोष्ट..

🧐 जगात अनेक गोष्टी आपल्याला अशा दिसतात त्यात काहींचं आश्चर्य वाटतं तर काहींचं कुतूहलही! नवल वाटेल असं काहीतरी ब्रिटनमध्ये (इंग्लंड) दिसलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. तुमच्या कानावर असेलच की, तासगावची द्राक्षे ब्रिटनमध्ये पोहोचली त्याला आता एक तपाहून काळ होऊन गेला.

🪑 भंगारात विकलेली खुर्ची ब्रिटनमध्ये कशी?

Advertisement

▪️ तुम्हाला विश्वास बसणार नाही; पण आता याच तालुक्यातील सावळजच्या मंडप व्यावसायिकाने भंगारात विकलेली एक लोखंडी खुर्ची चक्क मँचेस्टरच्या उपाहारगृहात विराजमान झाली असून तिथपर्यंत ती कशी गेली याचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याची चर्चा सांगलीमध्ये रंगली आहे.

▪️ क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातील एका उपाहारगृहासमोर उभं राहून हा व्हिडीओ काढला आहे. ते म्हणतात की, “छान वातावरण आहे इथे, उन्हाळ्याचे शेवटचे थंड दिवस आहेत. फक्त एक गोष्टीचा मला धक्का बसला..” आणि लगेच ते ती खुर्ची दाखवतात ज्या लोखंडी खुर्चीवर ‘ बाळू लोखंडे’ असं नाव लिहिलेलं असतं.

Advertisement

▪️ खुर्चीवर असलेल्या लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला. या खुर्चीवर ‘बाळू लोखंडे, सावळज’ असे नाव आहे. हा व्हिडीओ ‘समाज माध्यमा’वर प्रसारित झाल्यानंतर काहींनी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. आजही त्यांचा माया मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय सुरू आहे.

📍 लोखंडे यांनी माहीती दिली की, या एका खुर्चीचे वजन 13 किलो असल्याने हाताळण्यात अडचणी येत होत्या. याच वेळी प्लॅस्टिकच्या खुर्च्या बाजारात आल्याने त्या हाताळणीस योग्य ठरत असल्याने या लोखंडी खुर्च्या आम्ही भंगारात विकल्या होत्या. भंगारात विकलेली खुर्ची ब्रिटनमध्ये कशी गेली याची काहीही माहिती नाही असेही त्यांनी सांगितले. समाज माध्यमावर मात्र ‘ब्रिटनने भारताला कसे लुबाडले’ इथपासून ‘जुने ते सोने’ ही म्हण आपण कशी विसरत चाललो आहोत, याचे दाखले बाळू लोखंडे यांच्या खुर्चीवरून दिले जात आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 स्प्रेडइट न्यूजचा Whats App क्रमांक तुमच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करा आणि अगदी मोफत मिळवा, ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स नि माहिती-मनोरंजन.! त्यासाठी लगेच ग्रुपमध्ये अ‍ॅड करा हा नंबर 👉 7066317503

Advertisement