SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांना वीज पारेषणमध्ये नोकरीची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज..!

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीतील अप्रेन्टिस – इलेक्ट्रीशियन पदासाठी भरती होत आहे. पुणे आणि जेजुरी इथे ही भरती होणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदासाठी ही भरती होत असून. पात्र व इच्छूक उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

Advertisement

या पदासाठी भरती
अप्रेन्टिस – इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) – एकूण जागा 22

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

Advertisement
  • उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांन्त परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (इलेक्ट्रीशियन) या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा
या पदभरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

कुठे करणार अर्ज..?

Advertisement

https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1

महत्त्वाच्या सूचना
– ऑनलाईन अर्ज सादर करताना दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिकेत नमूद केलेले नाव हे आधारकार्डवरील नावाशी सुसंगत आहे का, याची पडताळणी करुनच माहिती भरावी.

Advertisement

– दहावी व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रकाची ओरिजिनल प्रत ऑनलाईन अर्जात अपलोड करावी.

– शिकाऊ उमेदवारांची सही, पालकांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एसएससी व आयटीआय मार्कची माहिती अचूक भरावी.

Advertisement

– ऑनलाईन अर्ज भरताना सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे. भरतीदरम्यान उमेदवाराशी संपर्क होऊ शकला नाही, तर कंपनी जबाबदार राहणार नाही.

– राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र सादर करावे.

Advertisement

– शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीसाठी ई-मेलद्वारे दिनांक, वेळ आणि स्थळ कळविण्यात येईल. त्यावेळी उमेदवारांनी उपस्थित राहावे.

आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साईज फोटो-२
ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मूळ प्रती)
शाळा सोडल्याचा दाखला

Advertisement

बोर्ड प्रमाणपत्र
आयटीआय गुणपत्रक (चारही सत्र / वार्षिक)
मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र
आधारकार्ड
बँक पासबुक (मुळ प्रत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021

Advertisement