SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हाट्सॲपचं ‘हे’ फीचर धुमाकूळ घालणार, तुमच्या मोबाईलमधील फोटोचं वाचा काय होणार?

व्हाट्सॲप नेहमीच जबरदस्त फिचरवर काम करत असतं. आता जगभरात आपले यूजर्स दिवसेंदिवस वाढवणारे ‘व्हाट्सॲप’ लवकरच एक नवं फीचर लाँच करणार असल्याची चर्चा आहे. असं म्हटलं जातंय की, या फीचरद्वारे व्हाट्सॲप युजर्स आपले स्वतःचे काढलेले फोटो स्टिकर्स (Whatsapp Stickers) च्या रुपात बदलू शकतात.

▪️ व्हॉट्सअ‍ॅप सध्या या फीचरवर काम करत आहे. हे WhatsApp फिचर iOS आणि Android असणाऱ्या दोन्ही युजर्ससाठी तयार करण्याचा प्रयत्न आहे.

Advertisement

▪️ रिपोर्टनुसार, सध्या व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अशा जबरदस्त फीचरवर काम करत आहे की, ज्याअंतर्गत सर्व व्हाट्सॲप वापरकर्ते आपले स्वतःचे किंवा मोबाईलमधील इतर कुणाचेही फोटो स्टिकर्स रुपात बदलू शकणार आहेत.

▪️ व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर्सनुसार, ज्यावेळी हे फीचर उपलब्ध होईल, त्यावेळी कॅप्शनजवळ एक स्टिकर आयकॉनही दिसेल.

Advertisement

▪️ व्हॉट्सअ‍ॅप क्रॅकर्सद्वारा एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. आपले फोटो स्टिकर्समध्ये बदलण्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये एक स्पेशल ऑप्शन दिला जाईल.

▪️ जेव्हा हे वैशिष्ट्य उपलब्ध होईल, तेव्हा युजरला एक फोटो सिलेक्ट करावा लागेल आणि त्याच्या ऑप्शनवर क्लिक करून जेव्हा तुम्ही ते निवडाल तेव्हा फोटो स्टिकरच्या रुपात पाठवला जाईल.

Advertisement

▪️प्राप्त माहीतीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने फोटोला स्टिकर बनवू शकणाऱ्या या फिचरला बनवण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर केला असल्याचं कळतंय. हे फीचर बीटावर दिसत नाही. त्यामुळे हे फीचर अद्यापही टेस्ट केलं जात असल्याचं समजतं.

WhatsApp ने अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे हे ‘Send Image as Sticker’ feature कधी लाँच केलं जाईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्या नाही, म्हणून ती कधी सुरू होईल हे भविष्यातील अपडेटमध्येच कळेल. व्हाट्सॲप भविष्यातील अपडेटसाठी लोकांना मल्टी-डिव्हाइस आवृत्तीमध्ये अपडेट करण्यास भाग पाडण्यावर काम चालू आहे, असं अहवालात म्हटले आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement