SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर..

– किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा अन् हायहोल्टेज पॉलिटिकल ड्रामा.. रेल्वे प्रवास सुरु असताना कराडमधूनच सोमय्या पोलिसांच्या ताब्यात.. गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

– किरीट सोमय्या फक्त टूल, खरे मास्टर माईंड चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफांचा आरोप.. सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा मुश्रीफ यांच्याकडून पुनरुच्चार..

Advertisement

– राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत.. पण सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते.. आरोग्यमंत्री राजेश टोपे

– राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, संपूर्ण मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी.. राज्यभरात मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी..

Advertisement

– तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी अटकेत, बहुचर्चित प्रकरणातील पहिलीच अटक.. आता कारवाईला वेग येण्याची अपेक्षा..

– राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी.. सोनिया गांधींकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब..

Advertisement

– कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाचे आरोप, दुसऱ्या कोर्टापुढे खटला चालवण्याची विनंती. जावेद अख्तर मानहानी प्रकरण, अखेर कंगना रनौत अंधेरी कोर्टात हजर, पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला.

– राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत सोने 14 रुपयांनी किरकोळ वाढून 45,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीच्या भावात 98 रुपयांनी वाढू होऊन 58,890 रुपये प्रति किलोवर..

Advertisement

– देशात गेल्या 24 तासांत 30,256 नवे कोरोनाबाधित; सर्वाधिक रुग्ण केरळात. राज्यात रविवारी 3413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8326 रुग्ण कोरोनामुक्त..

– मनसेचे पुन्हा खळ्ळ खट्याक; भिवंडी – ठाणे – भिवंडी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा इशारा वारंवार देऊनही खड्डे कायम असल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी भिवंडी महामार्गावरील टोल नाका फोडला.

Advertisement

– IPL 2021 : कोहलीचे धुरंदर कोलकात्याशी भिडण्यासाठी सज्ज, अबू धाबीच्या मैदानात रंगणार सामना..

 

Advertisement