SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकेने चुकून 5.50 लाख रुपये पाठवले, परत न देता त्याने ‘मोदींचे’ नाव घेतले; वाचा नेमकं प्रकार काय?

जगात बँकिंग संबंधित कित्येक घटना होतात, ज्यात कमी फ्रॉड करतो तर कोणी पैसे चोरतो. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील खगरियामधून एक रोचक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीच्या खात्यात चुकून 5.50 लाख रुपये जमा झाले. मोदी सरकारमार्फत मदत मिळाली असेल, असं त्याने विचार करून ते पैसे खर्चदेखील केले.

बँक अधिकाऱ्यांना त्यांची चूक कळल्यावर त्यांनी त्या माणसाला ‘बँक खात्यातील आलेले पैसे परत द्या’, अशी विनंती केली. पण व्हायचं ते झालंच! त्या माणसाने एवढे मोठे पैसे परत करण्यास नकार दिला. मग बँकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवले.

Advertisement

आता तसं बघितलं तर, बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच हे खगरियाच्या मानसी ब्लॉकच्या बख्तियारपूर ग्रामीण बँक शाखेच्या खातेदाराच्या खात्यात 5.50 लाख रुपये पाठवण्यात आले, मग बँकेच्या या चुकीमुळे बँक खातेदार रणजीत कुमार दास आपल्या खात्यात पैसे पाहून इतके खूश झाले की सगळं काही मिळवल्यासारखा आनंद झाला आणि ते पैसे सरकारकडून मदत मिळाली असे समजून त्याने खर्च केले.

पैसे परत करण्यास त्याने दिला नकार..

Advertisement

संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची ही मोठी चूक कळल्यावर त्यांच्या अवस्था टेन्शन मध्ये असल्यासारखी होऊन झोपच उडाली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रणजीतला बँकेचे पैसे परत करण्यास सांगितले. यावर रणजीत म्हणाला, “हा पैसा मोदी सरकारने पाठवला आहे, त्यामुळे तो परत करणार नाही”, यानंतर, ग्रामीण बँकेच्या बख्तियारपूर शाखेने रणजितच्या नावाने नोटीस पाठवली. हे झालं तरीही रणजितने पैसे परत केले नाहीत.

मग अखेर बँकेच्या अधिकाऱ्यांनी रणजीतवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर घडलेल्या प्रकाराची चौकशी करूम रणजीत नावाच्या या महाभागाला अटक केली आहे. या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासात माहीती मिळवली आहे की, रणजीतच्या खात्यात 5.50 लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्याने ते पैसे खर्च केले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement