केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ते साऱ्या देशाला माहिती आहे. भर कार्यक्रमात बोलताना ते कचरत नाहीत. विशेष म्हणजे, विरोधकांबरोबरच स्व-पक्षातील नेत्यांचे कान उपटायलाही ते मागे-पुढे पाहत नाहीत.
देशातील रस्तेविकासातील त्यांचे योगदान मोठे असल्यानेच कौतुकाने त्यांना ‘रोडकरी’ असे म्हटले जाते. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाची त्यांनी आज (गुरुवारी) पाहणी केली. त्यानंतर हरियाणातील सोहना येथे झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला.
Interaction with Media at Bundi, Rajasthan. #PragatiKaHighway #DelhiMumbaiExpressway https://t.co/O1M9VgK9QX
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 16, 2021
Advertisement
रामटेक येथील रस्त्याच्या बांधकामात सासऱ्याचे घर आडवे येत असताना त्यांनी काय केले, हे त्यांनी भर कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले, की “तेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. रामटेक येथील एका रस्ताचे काम सुरु होते. मात्र, या कामात माझ्या सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते.”
रस्त्याच्या कामासाठी पत्नीला कोणतीही कल्पना न देता, मी सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला. रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर घरात काय झाले, ते मात्र गडकरी यांनी सांगितले नाही. हे वक्तव्य ४३.५० सेकंदांनंतर सुरु होते..
टोलसाठी पैसे द्यावेच लागतील
दरम्यान, टोलबाबत गडकरी म्हणाले, की तुम्हाला चांगल्या सुविधा हव्या असतील, तर पैसे द्यावेच लागतील. लग्न तर खुल्या मैदानातही होते, परंतू त्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात, असे उदाहरण त्यांनी दिले.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस हायवेसाठी मंत्रालयाचे बजेट केवळ 1 लाख कोटींचे आहे. मात्र, आम्ही 15 लाख कोटींचा रस्ता बनवित आहोत. आम्ही गुंतवणूकदारांकडून पैसे घेत असू, तर त्यांना ते मागेही द्यावे लागणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना जास्त मोबदला
नितीन गडकरी पुढे म्हणाले, की मीही एक शेतकरी आहे. जमिनीच्या बदल्यात सरकार शेतकऱ्यांना जास्त पैसे देतेय. आम्ही वाहतूक कोंडी, प्रदूषण मुक्तीसाठी काम करीत आहोत. या एक्सप्रेस वेवर ट्रकदेखील विजेवर चालविण्याचे माझे स्वप्न आहे.