SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला माहीती आहे का, कसा झाला 500 कोटींची उलाढाल करणाऱ्या ‘सुला वाईन्स’चा जन्म..?

जगभरात वाईन-प्रेमी आपल्याला भरपूर सापडतील. हे आजकाल फक्त मद्यप्रेमींचंच आवडतं पेय होतं, आता ती फॅशन म्हणून बडलत्या काळात सर्वसामान्य लोकही पितात, असं आपण बऱ्याचदा पाहतो. कदाचित तुमच्यातील काही लोकांना हे माहीत असेल की, वाईनची विक्रमी विक्री करण्याचा पराक्रम महाराष्ट्रातील एक उद्योग समूह मागच्या 20 वर्षांपासून करत आहे आणि त्यांनी 2000 साली एक प्रकल्प सुरू केला त्याचा आता 500 कोटी रुपयांपर्यंत टर्नओव्हर पोहोचला आहे.

जाणून घेऊ या उद्योग समूहाची यशोगाथा..

Advertisement

वाईन म्हटलं की, अर्थातच ‘नाशिकची द्राक्षे आणि वाईन’ हे समीकरण चटकन आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यातही येतं की, उत्तम प्रकारची वाईन मिळणं. ‘राजीव सामंत’ या मराठी माणसाने या उद्योगात उतरणं आणि इतकी मोठी मजल मारणं हे खरंच कौतुकास्पद आहे. तर आपल्यापैकी काहींनी तर जगात नाशिकचं नाव पोहोचवणाऱ्या ‘सुला वाईन्स’ला नक्कीच भेट दिली असेल. द्राक्षाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलल्या नाशिक शहरात सुला वाईन्सची निर्मिती आणि निर्यात करून सुला वाईन्सने जगातील प्रमुख वाईन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

कल्पना करा की.. जितकी त्यांच्या वाईनची चव चांगली तितकीच नाशिकची ‘सुला वाईनयार्ड’ ही जागा भारी आहे. समोर हिरवेगार शेत, मध्यभागी गॅलरी सारखं एक हॉटेल किंवा टेस्ट सेंटर, लांबपर्यंत नजर गेली की, दिसणारी हिरवी शालू पांघरलेली शेती आणि हातात वाईनचा तो ‘तसला’ ग्लास! नाही का?

Advertisement

अधिक माहीतीसाठी सुला वाईन्सच्या वेबसाईटला भेट द्या👉 https://sulavineyards.com/

आता आज राजीव सामंत यांचा काही वर्ष भारताबाहेर काम करून मग नाशिकमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याचा अनुभव आपण जाणून घेऊ..

Advertisement

‘सुला वाईन्स’ची सुरुवात कशी झाली?

‘सुला वाईन्स’ ची सुरुवात करणारे राजीव सामंत यांचा जन्म मुंबईत 1996 मध्ये झाला होता. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं आणि पदव्युत्तर शिक्षण हे इंजिनियरिंग मॅनेजमेंट मध्ये घेतलं होतं. दोन वर्ष अमेरिकेत नोकरी केल्यानंतर त्यांना भारतात येऊन स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती.
राजीव सामंत यांच्या परिवाराने नाशिकमध्ये 20 एकर्सचा एक प्लॉट आधीच घेऊन ठेवला होता. सुरुवातीच्या काळात या शेतामध्ये आंबे, फुलं, सागवान, द्राक्ष अशा प्रकारची शेती केली जायची.

Advertisement

1996 राजीव सामंत यांच्या लक्षात आलं, की नाशिकचं वातावरण हे द्राक्षासाठी उपयुक्त आहे. काही दिवस संशोधन करून त्यांनी परत एकदा कॅलिफोर्नियाला जायचं ठरवलं. ‘केरी डांसकी’ या अनुभवी वाईन तयार करणाऱ्या व्यक्तीची राजीव सामंत यांनी भेट घेतली. नाशिकच्या वाईनसाठी उपयुक्त वातावरणाबद्दल त्यांनी केरी यांना सांगितलं. दोघांनी एकत्र येऊन नाशिकच्या जागेत वाईन तयार करण्याचा प्लॅन्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला.

‘सुला’ हे नाव राजीव सामंत यांच्या आईच्या ‘सुलभा’ या नावावरून ठेवण्यात आलं होतं ज्याचा अर्थ संपन्न असा होतो. त्यांनी दोघांनी 1997 मध्ये या फक्त वाईनसाठी उपयुक्त असणाऱ्या द्राक्षांवर फ्रांस, कॅलिफोर्निया, चेनिन ब्लॅंक सारख्या झाडांची शेती भारतात पहिल्यांदा केली. ‘सुला वाईनयार्ड्स’ ही कंपनी 1998 मध्ये अस्तित्वात आली आणि 2000 साली ‘सुला वाईन्स’ निर्मित पहिली वाईन लोकांपर्यंत पोहोचली आणि काही लोकांनी प्रतिसाद देत तिची चवही चाखली.

Advertisement

पुढील 20 वर्षात ‘सुला वाईन्स’ ही 65% मार्केट शेअरसोबत भारतामधील सर्वात मोठी आणि सर्वच किंमतीत, रंगात वाईन उपलब्ध असलेली एकमेव कंपनी आहे. 2005 साली सुला वाईन्सने ‘टेस्टिंग रूम’ ही कन्सेप्ट नाशिकच्या प्लॅन्ट मध्ये सुरू केली आणि हीच कृती त्यांना यश मिळवून देणारी ठरली.

सुला वाईन्सने ‘टेस्टिंग रूम’ची संकल्पना 2005 साली त्यांच्या नाशिकच्या प्लॅन्ट मध्ये सुरू केली. दोन वर्ष तर त्यांना फक्त वाईन बनवण्याचा परवाना मिळवण्यासाठी लागले खरे पण आज ‘सुला वाईनयार्ड्स’ मध्ये एकूण 1000 पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. 2019 हे वर्ष सुला वाईन्सनं विक्रमी विक्री करण्यात गेलं, कारण या वर्षात कंपनीने 10 लाखांहून अधिक वाईन्सच्या सेटची विक्री केली होती.

Advertisement

काही लोकांना माहीतच असते की, दारू किंवा रम जुनी असली की मस्त असते. पण वाईनमध्ये जर म्हटलं तर वाईन जितकी जुनी तितकी चांगली हा एक सरसकट समज असतो, पण तो पांढऱ्या वाईनसाठी लागू होत नाही. कारण पांढरी वाईन ही तयार होण्यापासून दोन वर्षांच्या आत संपवावी लागते तर लाल वाईन ही जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत आपण स्टोअर करून वापरू शकतो, अशी माहीती आहे.

राजीव सामंत यांनी दिलेल्या माहीतीनुसार, ‘सुला रस’ आणि ‘कॅबरनेट’ या दोन प्रकारच्या वाईन्स 10 वर्षांहून अधिम काळ टिकवल्या जातात. असं राजीव सामंत यांनी 20 वर्षपूर्तीच्या मुलाखतीत सांगितलं होतं. अशी ही नाशिकचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारी ‘सुला वाईन्स’ आजमितीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या 30 देशांमध्ये वाईनची निर्यात करत असते. सुला वाईनसाठी काम करणारे शेतकरी हे सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये काम करतात.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement