SpreadIt News | Digital Newspaper

सहावीतील दोन विद्यार्थी रात्रीतून मालामाल, एकाच्या खात्यावर 900 कोटी, तर दुसऱ्याच्या खात्यावर आले 60 कोटी रुपये..

0

ऑनलाइन बँकिंग करताना फार मोठी काळजी घेणे गरजेचे असते. एखादी किरकोळ चूकही भलतीच महागात पडू शकते. बॅंकेतून भलत्यात खात्यावर पैसे गेल्याचे ऐकायला, वाचायला मजा येत असली, तरी ज्यांचे पैसे जातात, त्यांची पाचावर धारण बसलेली असते..

असाच एक प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे. सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या खात्यांवर अचानक कोट्यवधी रुपये आले. हे पैसे कोणाचे, कुठून आले, याचा शोध सुरु असतानाच अधिकाऱ्यांच्या मागे दुसरीच डोकेदुखी लागली आहे.

Advertisement

ती म्हणजे, या मुलांच्या गावातली प्रत्येक व्यक्ती आपल्याही खात्यावर असे पैसे तर आलेले नाहीत ना, हे पाहण्यासाठी बँकेत धाव घेत आहे. त्यामुळे बॅंकेसमोर भलीमोठी रांग लागली. या लोकांना समजून सांगता सांगता अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.. नेमका हा काय किस्सा आहे, जाणून घेऊ या..

बिहारमधील कटिहारमधल्या आझमनगर इथल्या पस्तिया गावात हा प्रकार घडला. गावातील आसित कुमार आणि गुरुचरण विश्वास हे दोघे सहावीत शिकतात. त्यांची उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या भेलागंज शाखेत खाती आहेत. मात्र, अचानक या दोघांच्या खात्यांवर कोट्यवधी रुपये जमा झाले.

Advertisement

कोट्यवधी रुपये खात्यावर जमा 
विद्यार्थी असित कुमारच्या 1008151030208001 या बँक खात्यावर 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली, तर गुरुचरण विश्वास याच्या 1008151030208081 या बँक खात्यामध्ये 60 कोटींपेक्षा रक्कम जमा झाली. शालेय साहित्य व गणवेश खरेदीसाठी त्यांच्या खात्यावर ५०० रुपये येतात.

गणवेशासाठीचे पैसे खात्यावर जमा झाले का, हे पाहण्यासाठी हे दोघे विद्यार्थी आपल्या नातेवाईकांसह गावातल्या सायबर सेंटरवर गेले होते. तिथे त्यांनी आपल्या खात्याचं मिनी स्टेटमेंट तपासले असता, खात्यावर कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे पाहून त्यांच्यासह नातेवाईकांचेही डोळे पांढरे झाले.

Advertisement

दोन्ही विद्यार्थ्यांनी तातडीने घरी जाऊन ही बाब कुटुंबीयांना सांगितली असता, तेही उडालेच. गावच्या सरपंचांशी संपर्क साधला असता, त्यांनीही अशी घटना घडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

ऑनलाइन बँकिंग करताना चुकून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. रक्कम मोठी असल्यामुळे ती जिथून आली, त्या खातेदाराकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल. याबाबत बॅंकेकडून चौकशी सुरु होती.

Advertisement

बॅंकेसमोर लोकांची गर्दी
दरम्यान, आपल्याही खात्यावर असे पैसे आले आहेत का, हे पाहण्यासाठी लोक बॅंकेकडे धाव घेत आहेत. मोदी सरकारनेच हे पैसे खात्यावर टाकल्याचाही काहींचा गैरसमज झाला असून, त्यामुळे बॅंकेसमोर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे सांगण्यात आले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement