SpreadIt News | Digital Newspaper

थप्पड गर्लनंतर आता तरुणीला मारहाण करणारा ‘बुक्की बॉय’ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ..

0

थप्पड गर्लचा व्हायरल व्हिडीओ असेल वा दुसरं काही बहुतांश प्रकरणात तरुणाला चोप दिल्याचं आपण पाहिलंच आहे. ऑगस्टमध्येच लखनऊमध्ये एका तरुणीनं कॅब चालकाला केलेल्या मारहाणीची घटना चांगलीच गाजली होती. त्यानंतर टेम्पो चालकाची एका महिलेनं चपलेनं केलेल्या धुलाईचीदेखील जोरदार चर्चा रंगली होती. पण एका ठिकाणी एक ‘बुक्की बॉय’चं प्रकरण चांगलंच गाजत आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ते’ चोप दिल्याचं प्रकरण, वाचा..

Advertisement

एका तरुणाची तरुणीने शेरेबाजी करून छेडछाड केल्याचं स्वतः त्या तरुणाने सांगितलं आहे. या व्हिडीओमधील तरुणाने लोकांचा जमाव जमला असतानाही भर रस्त्यात तरुणीला मारहाण बुक्कीने मारहाण करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचं अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढलं आहे आणि अनेकांनी त्याचा प्रचार सोशल मीडियावर केला आहे.

उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील मेट्रो स्टेशन परिसरात ही घटना घडली. या व्हिडिओत एक तरुण तरुणीच्या तोंडात मारत आहे तर बुक्क्यांनीही पोटात मारत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट/अपलोड केल्या आहेत.

Advertisement

मग तिथं खूपच गर्दी उसळल्याचं दिसलं. हा तरुण रागाने थरथरत होता आणि तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे; पण तरुणीला मारहाण करणं कितपत योग्य आहे, यावर काही प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

Advertisement

मदतीसाठी तरुणीची विनंती..

काही नागरिक तरुणाची समजून घालण्याचा दूरूनच प्रयत्न करत होते. मात्र त्यातील कुणाचंही न ऐकता तरुण तरुणीला मारहाण करत होता. तरुण बुक्क्या मारत होता आणि त्यावेळी तरुणी कुणीतरी मला वाचवा, अशा किंकाळ्या ही तरुणी फोडत होती. तरुणी मदतीसाठी उपस्थितांकडे याचना करत होती. मात्र तिथे उपस्थितांपैकी कोणीही सुरुवातीला तिच्या मदतीसाठी आले नाहीत तर उलट लोक हे त्यांच्या मोबाईलवर या घटनेचं चित्रिकरण करण्यातच मग्न असल्याचं दिसलं.

Advertisement

काही वेळाने एका तरुणाने पुढाकार घेत मारहाण करणाऱ्या तरुणाच्या ताब्यातून तरुणीला सोडवले. त्यानंतर तरुणीला शिव्या घालत तो तरुण तिथून निघून गेला. अजूनपर्यंत मारहाण झालेली तरूणी पोलिसांकडे आलेली नाही. तिने तक्रारही दिली नाही, तर सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याच्या आरोपाखाली या तरुणावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement