SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तालिबान्यांना माजी उपराष्ट्रपतींच्या घरातून सापडलं लाखोंचं घबाड! सोन्याच्या विटा मोजतानाचा पाहा व्हिडीओ…

जगात धक्कादायक परिस्थिती निर्माण करणारे, दहशतवादी संघटना तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता स्थापन करताच जुलुमी राजवट सुरु केली आहे. अशा क्रुर तालिबानला अफगाणिस्तानामधील पंजशीर प्रांतातून चांगलाच विरोध केला गेला. मात्र आठवड्यात तालिबानने पंजशीरमध्येही तालिबानने कब्जा मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तावर आता पूर्णपणे तालिबानचे क्रुर, जुलमी हुकुमशाही राजवटीची सत्ता आहे, असं म्हटलं जात आहे.

माजी उपराष्ट्रपतींच्या यांच्या घरातून सापडलं मोठं घबाड..!

Advertisement

अफगाणिस्तानात पंजशीरमध्ये तालिबानच्या सत्तेविरोधी पाऊलं उचलणारे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून मोठं घबाड हाती लागलं आहे. तालिबान्यांना सालेह यांच्या घरातून कोट्यवधी डॉलर्स आणि सोन्याची बिस्किटे सापडली आहे. बॅगच्या बॅग भरुन नोटा मोजताना दिसतायत. या नोटा मोजताना तालिबान्यांना तर घाम फुटलाय. यासंबंधीत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Advertisement

तालिबानच्या मल्टिमीडिया शाखेचा प्रमुख अहमदुल्ला मुत्तकी याने ट्वीटरवर याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला. सालेह यांच्या घरावर छापा मारल्याचा दावा त्याने केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घरातून तालिबान्यांना तब्बल 65 लाख डॉलर्स, 15 सोन्याची बिस्किटे तर मोठ्या प्रमाणावर दाग-दागिनेही सापडले आहेत. मात्र एवढी संपत्ती मोजता मोजता तालिबान्यांना अक्षरशः कंटाळा आला होता. व्हायरल व्हिडीओत तालिबान्यांच्या हातात डॉलरचे बंडलच बंडल आहेत. बाजूला सोन्याच्या वीटाही आहेत.

तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा मिळवताच महिनाभरात येथील अनेक शहारांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्नाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही अक्षरश: वणवण करावी लागतेय. अशा परिस्थितीत अनेकांनी घरातून वस्तू विकायल्या काढल्यात. काबूलमधील चमन-ए-होजोरी नावाच्या बाजारात तर लोक घरातील असेल नसेल ते सामान जसे की, भांडी, पंखे, सोफासेट अशा वस्तू विकायला घेऊन जातात. त्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच खराब होईल यात काही शंका नाही.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement