SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शैक्षणिक बातमी: जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या..

इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल काल मंगळवारी रात्री जाहीर (JEE Main Result 2021) झाला आहे. यामध्ये उल्लेखनीय अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहे. रँकिंगबाबत सांगायचं झालंच तर जेईई मेन 2021 च्या परीक्षेत 18 उमेदवारांनी रँक 1 मिळवला आहे.

आंध्रप्रदेशचे 4 व राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली, तेलंगणाच्या प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांचा टॉप-18 मध्ये समावेश आहे. भाषेच्या दृष्टीने जर तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे तर, 44 उमेदवारांना 100 गुण मिळाले आहेत.

Advertisement

ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवली आहे, त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. महाराष्ट्रात अथर्व अभिजीत तांबट याने जेईई मेनची 1 रँक मिळवून पहिला आला आहे. तो नवी मुंबईतील सानपाडा येथील शाळेत शिकला आहे. जेईई मेन परीक्षेतील रँक NITs, IIITs आणि CFTI मधील प्रवेशासाठी आणि इतर इंजिनियर कॉलेजच्या प्रवेशासाठी वापरला जाईल.

जेईई मेनचा निकाल कसा पाहायचा?

Advertisement

▪️ निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ला भेट द्या.
▪️ वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या ‘JEE Main 2021 session 4 results’ लिंकवर क्लिक करा.
▪️ तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिटी कोड भरा, लॉगिन करा.
▪️ आता चौथ्या सत्रासाठीचा जेईई मेनचा निकाल समोर येईल, (निकालासोबतच विद्यार्थ्यांना Answer Key वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.)
▪️ तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट आऊट घ्या.

जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी करण्यासाठी..

Advertisement

जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 (आजपासून) पासून सुरु होत आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे. नोंदणी झाल्यानंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 दरम्यान आहे. तर 3 ऑक्टोबर 2021 ला परीक्षा होणार आहे.

एनटीएनं (NTA) 26, 27, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी सुमारे 7.32 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिली. NTA ने भारतातील 334 शहरे आणि 600 पेक्षा जास्त केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा घेतली होती. यावर्षीपासून संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळू शकेल. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिसरा टप्पा 20-25 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तर चौथा टप्पा 26 ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement