SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रजनीकांतच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवर शिंपडलं ‘बकरीच रक्त’, नेमक काय घडलं? जाणून घ्या..

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ (Annaatthe) वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी पहिला लूक शुक्रवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. पांढरा शर्ट घालून रजनीकांत ‘सुपरकूल’ दिसत आहेत. पोस्टरमध्ये मंदिर उत्सवाची पार्श्वभूमी दिसत आहे.
जेव्हा रजनिकांतचा  एखादा चित्रपट रिलीज होतो, तेव्हा चाहते त्याच्यावर अफाट प्रेम दाखवतात. त्यांच्या फोटोला दही – दुधाचा अभिषेक हा तर ठरलेलाच असतो. दिवाळी सणानिमित्त ‘अन्नाथे’ चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय.  आता इतक्या वर्षांपासून आपल्या लोकप्रियतेचे ठसे जगभर उमटवणाऱ्या सुपरस्टारच्या काही फॅन्सना मात्र हे पचेनासे झाले आहे. त्यांच्या फॅन्सन जे काही केलं आहे त्यामुळे खुद्द रजनीकांत यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. आगामी काळात अन्नाथे नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराला शुभेच्छा देण्यासाठी जो काही प्रकार केला त्याची सर्वत्र चर्चा आहे.

नेमकं काय घडलं?
सुपरस्टार रजनीकांत यांच्या अन्नाथे चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्या चाहत्यांनी चक्क बकरीच्या रक्ताचा अभिषेक केला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडिय़ावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी पहिल्यांदा त्या बकरीला मारलं आणि तिचं रक्त पोस्टरवर शिंपडलं अशी माहिती समोर आली आहे. याप्रकारावर रजनीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला माझ्या चाहत्यांकडून अशा कृत्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी जे काही केलं ते ऐकून वाईट वाटल्याचं सांगितलं आहे.
अखिल भारतीय रजनीकांत रसिकर मंदरम फॅन्स क्लबच्या सदस्यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचे  समर्थन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रजनीकांतचे काही चाहते बकरीला मारुन तिचं रक्त त्या पोस्टरवर शिंपडताना एका व्हायरल व्हिडिओत दिसलं असल्याची चर्चाआहे. चाहत्यांच्या अशा प्रकारच्या हिंसक घटनेचा सोशल मीडियावरुन अनेकांनी निषेध केला आहे.
कलानिधी मारन दिग्दर्शित, रजनीकांत, मीना, खुशबू, नयनतारा, कीर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ, जगपति बाबू, प्रकाश राज, सूरी आणि सतीश यांच्यासह अनेक कलाकार अन्नाथेमध्ये दिसणार आहेत. जगभरात रजनीकांतचे फॅन्स (superstar rajinikanth) आहेत. थलायवा’ अर्थात सुपरस्टार रजनीकांत त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात.
Advertisement