SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ओलाच्या ईलेक्ट्रिक स्कूटरवर घसघशीत डिस्काऊंट, महाराष्ट्रात सर्वात स्वस्तात मिळणार..

वाढत्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळला आहे. केंद्र सरकारही त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता ईलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करु लागल्या आहेत. या कंपन्यांपैकीच एक म्हणजे, ओला..!

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओला कंपनीने ईलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिअंट लाँच केले. मात्र, त्यांची किंमत लाखांच्या वर होती. मात्र, आता केंद्रासोबतच महाराष्ट्र सरकारनेही सबसिडी सुरू केली. त्यामुळे ओलाच्या स्कूटरच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून, ती सामान्यांच्या आवाक्यात आली आहे.

Advertisement

ओला कंपनीने ‘एस-१’ आणि ‘एस-१ प्रो’ या व्हेरिअंटच्या दोन स्कूटर लाँच केल्या होत्या. पैकी ‘एस १’ची किंमत ९९,९९९ रूपये, तर ‘एस-१ प्रो’ची किंमत १,२९,९९९ रूपये एवढी ठेवण्यात आली होती.

२५ हजार रुपये वाचणार
महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी ईलेक्ट्रिक स्कूटरवरील सबसिडी लाईव्ह झाली. त्याचा थेट फायदा आता ग्राहकांना मिळणार आहे. ओलाने आपल्या या दोन्ही स्कुटरच्या किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या. त्यात दोन्ही स्कूटरमागे ग्राहकांचे जवळपास २५ हजार रुपये वाचणार आहे.

Advertisement

महाराष्ट्रात सबसिडी मिळाल्याने ओलाच्या ‘एस-१’ची किंमत ७५०९९, तर ‘एस-१ प्रो’ची किंमत १,००,१४९ रुपये एवढी झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ईलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी सर्वाधिक चांगली असल्याने स्वस्तात नागरिकांना ही स्कूटर मिळणार आहे.

ओला पुन्हा तोंडघशी
दरम्यान, ओला स्कूटर फायनल बुकिंग, म्हणजेच खरेदी, कर्ज प्रक्रिया करण्यासाठी कंपनीने सुरवातीला ८ सप्टेंबर ही तारीख दिली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कंपनीला काही ते शक्य झाले नाही. त्यामुळे ओलाने पुन्हा १५ सप्टेंबर सकाळी ८ वाजल्यापासूनची वेळ दिली.

Advertisement

ज्या ग्राहकांनी ४९९ रुपयांत स्कूटरची बुकिंग केली आहे, त्यांना आज सकाळी मेसेज पाठविण्यात आले. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावरही ओला अजूनही चार्जच करतेय, असा मेसेज आला. दुसरीकडे काहींना लिंकवर गेल्यावर, ओलाची स्कूटर रंगापर्यंत सिलेक्ट करता आली. नंतर वेबसाईट ठप्प झाली.

कर्जसुविधा उपलब्ध
स्कूटर खरेदीसाठी ओलाने कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिलीय. त्यासाठी ओला फायनान्स सर्व्हिस सुरु केली आहे. कंपनीने आयडीएफसी, एचडीएफसी, टाटा कॅपिटलसोबत हातमिळवणी केली आहे. ‘एस १’ व्हेरियंटचा ईएमआय २९९९, तर ‘एस १ प्रो’ व्हेरियंटचा ईएमआय ३१९९ रुपये ठेवला आहे.

Advertisement

दरम्यान, एचडीएफसी बँक ग्राहकांना काही मिनिटांत प्री अ‍ॅप्रूव्हड लोन देत आहे. त्यासाठी ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अ‍ॅप वापरावे लागणार आहे. केवायसी प्रक्रियेतून टाटा कॅपिटल आणि आयडीएफ बँक लोन देणार असल्याचे सांगण्यात आले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement