SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हाॅटस अपमध्ये आहेत भन्नाट सिक्रेट फिचर्स, चॅटिंग करतात आणखी मजेशीर..

व्हाॅटस् अप (WhatsApp) इंस्टंन्ट मेसेजिंग अॅप.. आजघडीला जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप. या व्हॉट्स अॅपमध्ये भरमसाठ फीचर्स दिले आहेत. मात्र, अनेकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही.

आपल्या युजर्ससाठी व्हाॅटस् अॅप सतत नवनवीन भन्नाट फिचर्स आणत असते. त्यापैकीच एक म्हणजे, व्हाॅटस अॅप चॅटिंग. संवाद साधण्यासाठी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हे चॅटिंग मजेशीर करणारे अनेक फिचर्स व्हाॅटस् अॅपमध्ये असून, आता तर त्याची रंगत आणखी वाढणार आहे.

Advertisement

व्हाॅटस् अॅपमध्ये अशी अनेक सिक्रेट फिचर्स उपलब्ध आहेत. मात्र, वापरकर्त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाही. मात्र, ही फिचर्स चॅटिंगचा अनुभव आणखी मजेशीर करतात. अशाच काही सिक्रेट फिचर्सबद्दल आज आपण जाणून घेऊ या..

ब्लू टिक
व्हाॅटस् अॅप मेसेजमधील सर्वात महत्वाचे फिचर म्हणजे, ब्लू टिक.. तुम्ही पाठविलेला मेसेज समोरच्याने पाहिला की नाही, याबाबतची माहिती याच ब्लू टिकच्या माध्यमातून समजते. मेसेजसमोरील टीक ब्लू झाली, की तुमचा मेसेज वाचल्याचे समजते.

Advertisement

काही वेळा समोरच्या व्यक्तीला तुम्हाला उत्तर द्यायचे नसते, अशा वेळी हे फिचर अडचण निर्माण करते. तुम्हाला जर हे बंद करायचे असेल, तर व्हाॅटस् अप सेटिंग्जमध्ये जा. तेथे तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय मिळेल. तेथून तुम्ही हे फिचर बंदही करु शकता.

प्रायव्हेट रिप्लाय
व्हाॅटस् अपचे आणखी एक खास फिचर म्हणजे, प्रायव्हेट रिप्लाय. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही ग्रुप चॅटमध्येही कोणत्याही मेसेजला एखाद्याला प्रायव्हेट रिप्लाय करु शकता. तो रिप्लाय एकालाच पाठविताही येतो..

Advertisement

त्यासाठी तुम्हाला ज्या मेसेजला प्रायव्हेट रिप्लाय द्यायचा असेल, त्यावर प्रेस आणि होल्ड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तीन डाॅटसचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. नंतर तुम्हाला प्रायव्हेटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही त्या युजर्सच्या प्रायव्हेट चॅट विंडोवर जाल. तेथे तुम्ही रिप्लाय करु शकता.

ऑटो मीडिया डाऊनलोड
व्हाॅटस अप बऱ्याचदा आपोआप तुम्हाला आलेले फोटो व व्हिडीओ तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह करीत असते. त्यामुळे फोनची मेमरी भरुन तो हॅंग होण्याची शक्यता असते. ग्रुपमध्ये आलेले अनेक फोटो काहीही उपयाेगाचे नसतात. आपल्याला ते नको असतात, पण ते ऑटो मीडिया डाऊनलोडमुळे सेव्ह होत असतात.

Advertisement

व्हाॅटस अपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही हे फिचर बंद करु शकता. सेंटिंग्जमध्ये हा पर्याय असून, त्यावर क्लिक केल्यावर नको असलेल्या फोटो व व्हिडीओतून तुम्ही सुटका करुन घेऊ शकता.

प्रोफाईल फोटो
व्हाॅटस् अपवर अनेक जण आपला स्वत:चा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवतात. मात्र, बऱ्याचदा तो अनोळखी व्यक्तीने पाहू नये, असे आपल्याला वाटत असते. त्यासाठी व्हाॅटस् अप सेटिंग्जमध्ये अकाऊंटवर क्लिक करा. त्यावर प्रायव्हसीवर क्लिक केले, की प्रोफाईल फोटोचा पर्याय दिसेल.

Advertisement

त्यात तुम्ही, एव्हरी वन, माय काॅन्टॅक्टस् किंवा नोबडी, असा पर्याय सिलेक्ट करु शकता. त्यानंतर कोणीही तुमचा प्रोफाईल फोटो पाहणार नाही.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement