SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रवीण दरेकर, माफी मागा.. नाहीतर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो – रुपाली चाकणकरांचा इशारा

भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सडेतोड उत्तर देत थेट थोबाड फोडण्याची धमकी दिली आहे. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा इशारा

Advertisement

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना स्पष्ट इशारा दिला आहे. (Rupali Chakankar warns Pravin Darekar over controversial statement)

“प्रवीण दरेकर तुमच्या बोलण्यावरुन तुमची आणि तुमच्या पक्षाची संस्कृती दिसून आली. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो, याची जाणीव ठेवा. तुमच्या बोलण्यावरुन तुमची संस्कृती काय आहे ते दिसतं. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकतेय, ती आपल्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवतेय. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे असे ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांना इशारा दिला आहे”, असे चाकणकर म्हणाल्या.

Advertisement

“आपल्या पक्षाच्या काही नेत्या आहेत. बाहेर फिरताना आपण किती महिलांच्या कैवारी आहोत हे दाखवून देत आहेत. आज मला त्यांची किव येत आहे. अशा महिला ज्या पक्षात काम करत आहेत, त्या पक्षाचा हा विचार आहे”, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

काय म्हणाले होते दरेकर?

Advertisement

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) गरिबांसाठी वेळ नाहीये. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे”, असा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला होता. हा कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 16 सप्टेंबरला लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement