SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विवाहित लोकांना दर महिन्याला मिळणार 10 हजारांची पेन्शन; सरकारची खास योजना काय, जाणून घ्या..

जगात प्रत्येकालाच आपल्या म्हातारपणी आपलं आयुष्य कसं असू शकतं याची चिंता जसजसं आपलं वय वाढत जातं तशी होतेच. मग आपलं उत्पन्न कमी असेल तर बचत करणं आपल्याला फायदेशीर ठरतं. आजच्या काळात तर बचतीपेक्षाही जास्त रिटर्न्स गुणवणूक केल्याने येतात, हे माहीतच आहे. पण रिस्क न घेता सरकारच्या अटल पेन्शन योजनेत पती -पत्नी स्वतंत्र खाती उघडून दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळवू शकतात.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी..

Advertisement

▪️ अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहक हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे व त्याला पती/पत्नीची माहीती देणं बंधनकारक आहे.
▪️ ग्राहक कोणतीही बँक शाखा / पोस्ट ऑफिसद्वारे (ऑनलाईन / ऑफलाईन मोडमध्ये, जे काही उपलब्ध असेल त्याद्वारे) सहभागी होऊ शकतात.
▪️ ग्राहकाचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष वय असावे.
▪️या योजनेत वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो. सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ घेतल्यास द्यावा लागतो.
▪️सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो. कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे.

▪️ अधिक माहीतीसाठी आपण पुढील वेबसाईटला भेट द्या 👉 https://www.npscra.nsdl.co.in/scheme-details.php
▪️ वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली 👉 APY Subscriber Information Brochure in Marathi या नावावर क्लिक करा आणि मराठीत माहीती वाचा.

Advertisement

अटल पेन्शन योजनेचे फायदे:

अटल पेन्शन योजनेंतर्गत ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्राहक प्रत्येक महिन्यात, तिमाहीत किंवा प्रत्येक सहामाही हप्त्यात त्यांची बचत थेट ठेवू शकतात. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूकदाराच्या मृत्यूच्या वेळी, त्याचे कुटुंब किंवा नामित व्यक्तीला पेन्शन मिळते. योजनेचा फायदा मुख्यतः असंघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना आहे. अटल पेन्शन योजनेंतर्गत अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतात.

Advertisement

गुंतवणूक कोणाला करता येणार?

अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. भविष्य सुरक्षित करण्यासाठी अटल निवृत्ती वेतन योजना हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. या योजनेत सहभागी होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना 60 वर्षानंतर 10,000 रुपये महिना पेन्शन मिळेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement