SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📣 3 महत्वाच्या शैक्षणिक बातम्या

1) नंदिनी अगरवाल सीए परीक्षेत देशात पहिली!

चार्टर्ड अकाऊंट्स अर्थात CA सारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत नंदिनी अगरवालने (Nandini Agarwal) 76.75 टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकाविला तर तिचा भाऊ सचिन अगरवाल (Sachin Agarwal) हा देशभरात 18 व्या रँकवर आहे. यासोबतच इंदूरच्या साक्षी एरन हिने 76.63 टक्के गुण मिळवून दुसरा आणि बंगलोर येथील साक्षी बाग्रेचा हिने 75.63 टक्के गुण घेत तिसरा क्रमांक मिळवला.

Advertisement

सीएच्या अंतिम परीक्षेच्या देशात 83,606 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. इतक्या विद्यार्थ्यांमधून या बहिण-भावानं मिळवलेलं यश विशेष आहे. नंदिनी 800 पैकी 614 गुण मिळवून देशात पहिली आली आहे. नंदिनी अगरवाल ही फक्त 19 वर्षांची तर तिचा भाऊ सचिन अगरवाल हा 21 वर्षांचा आहे. मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील व्हिक्टर कॉन्व्हेट स्कूलचे ते विद्यार्थी आहेत.

2) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर

Advertisement

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 4 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक जारी केलं आहे. या परीक्षा राज्यात एकूण 6 केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत.

परिपत्रकात दिलेल्या माहीतीनुसार, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 चा निकाल दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात केला आहे. त्यामध्ये 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर 2021 (mpsc examination will be held on december 4, 5, and 6 december 2021) रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा जिल्हा केंद्रांवर होणार आहे.

Advertisement

3) तामिळनाडूत ‘नीट’ न देताच मिळणार मेडिकलला प्रवेश?

तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील कुझैयूर गावातील गरीब घरातील मुलगा धनुष या 19 वर्षांच्या मुलाने शनिवारी (ता.11) सायंकाळी आत्महत्या केली. त्याने दोन वेळा नीटच्या परीक्षेला आवश्यक गुण न मिळवण्यात अपयशी ठरल्याने आत्महत्या केल्याची माहीती आहे. आत्महत्या केल्यानंतर दोनच दिवसाने तमिळनाडू विधानसभेत राष्ट्रीय चाचणी व पात्रता परीक्षा (National Eligibility cum Entrance Test) म्हणजेच ‘नीट परीक्षा कायमची बंद करण्यासंबंधीचे विधेयक एकमताने मंजूर केले.

Advertisement

तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Tamilnadu Chief Minister M.K. Stalin ) एम. के. स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार न्यायाधीश ए.के. राजन आयोग नेमला होता. या विधेयकानुसार, ज्या विद्यार्थ्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, ते विद्यार्थी 12 वीच्या गुणांवर प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे नीट परीक्षा देण्याची आवश्यकता नसणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना 7.5 टक्के प्राधान्य असेल. आता या विधेयकात सरकारने NEET परीक्षेत राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement