SpreadIt News | Digital Newspaper

धोनीला टीम इंडियाचे मेंटाॅर का नेमलं..? सौरभ गांगुलीने केला मोठा खुलासा..!

0

आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी ‘बीसीसीआय’ने टीम इंडियाची घोषणा करताना, मेंटाॅर म्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची निवड केली. त्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. काहींनी तर थेट धोनीच्या निवडीवर आक्षेप घेताना, बीसीसीआयकडे तक्रारही केली आहे.

दरम्यान, धोनीच्या निवडीवरुन एकीकडे असे कवित्व सुरु असताना, बीसीसीआय मात्र आपल्या निर्णयावर ठाम  असून, धोनी युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडियाला युक्तीच्या चार गोष्टी सांगताना दिसणार आहे, पण नेमकं असं अचानक काय घडलं, की धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून नेमण्याची वेळ आली..?

Advertisement

याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना, खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यानेच आता या प्रकरणावर भाष्य केले आहे. याबाबत गांगुलीने नुकतीच माध्यमांना माहिती दिली.

स्पर्धा जिंकायचीच आहे..
तो म्हणाला, की “यूएईत होणारी ही महत्त्वाची स्पर्धा आहे. धोनीची वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मोठी मदत मिळेल. टी-२० फॉरमॅटमध्ये भारताकडून व चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार आहे. त्याच्या निवडीमागे अनेक विचार होते. आम्ही खूप चर्चा केल्यावरच हा निर्णय घेतला आहे.”

Advertisement

“२०१३नंतर आम्ही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. ऑस्ट्रेलियानेही स्टीव्ह वॉ याच्यावर अशीच जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी इंग्लंडमध्ये झालेली अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.”

“मोठ्या खेळाडूचे सोबत असणेही संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विराट कोहली अँड टीमला कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा जिंकायची असल्यानेच, धोनीला मेंटाॅर म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला,” असे गांगुलीने स्पष्ट केले आहे.

Advertisement

टीम इंडियाने २०१३मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. नंतर ८ वर्षांत टीम इंडियाला आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.

कोणाचीच हरकत नाही..
या निर्णयबाबत बोलताना जय शाह म्हणाले, की ”आम्ही दुबईत धोनीसोबत चर्चा केली. त्यानेही ही जबाबदारी पार पाडण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा मेंटाॅर होण्यास तो तयार आहे.

Advertisement

कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबतही आम्ही बोललो. त्यांनाही हा निर्णय पटल्यानेच धोनीची निवड केल्याचे शाह यांनी सांगितले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement