टी-२० वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना, टीम इंडियात वेगळ्याच घडामोडी सुरु आहेत. ‘बीसीसीआय’ क्रिकेटच्या वेगवेगळ्या फाॅरमॅटसाठी आता वेगवेगळे कर्णधार नेमण्याच्या विचारात असल्याचे समोर येतंय. सध्या क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये विराट कोहलीच कॅप्टन आहे.
एका रिपोर्टनुसार, आगामी टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली हा वन-डे व टी-२० चे कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं जातं. कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे वन-डे, टी-20 ची कप्तानी दिली जाईल, तर फक्त कसोटी संघाचाच विराटच कॅप्टन राहणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराट हा निर्णय घेणार असल्याचे समजते. टी-20 विश्वचषकानंतर हे फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी याबाबत बीसीसीआयकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या या प्राथमिक चर्चा असल्याचं सांगण्यात येतंय.
आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही जेतेपद पटकाविता आलेले नाही. मग ती २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी असो, वा २०१९ चा वन-डे वर्ल्ड कप.. या दोन्ही स्पर्धेत टीम इंडियानं विराटच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे अंतिम व उपांत्य फेरीतपर्यंत धडक मारली होती.
#BCCI (@BCCI) treasurer Arun Dhumal on Monday rubbished reports suggesting that Team #India captain #ViratKohli (@imVkohli) is likely to step down as skipper of the limited-overs format after the ICC T20 World Cup. pic.twitter.com/jQ7wErMoLg
— IANS Tweets (@ians_india) September 13, 2021
Advertisement
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२०-२१ स्पर्धेतही टीम इंडियाचा अंतिम सामन्यात न्युझीलंड संघाने पराभव केला होता. त्यामुळेच आगामी टी-२० वर्ल्ड कपनंतर विराटला वन-डे व टी-२० च्या कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विराटने फक्त टेस्ट टीमचे नेतृत्व सांभाळावे व मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे द्यावी, अशी मागणी याआधीही होत होती. मात्र, त्यावर संघात फूट पडण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, आता हा निर्णय झाला असून, रोहितच टी-२० व वन डे संघाचा कर्णधार बनणार असल्याचा दावा केला जात आहे.
बीसीसीआय काय म्हणते..?
विराट कोहली हाच टीम इंडियाचा सर्व प्रकारच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असेल. कर्णधारपदाच्या जबाबदारीच्या विभाजनाबद्दल आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. या चर्चा केवळ अफवा असल्याचे बीसीसीआयच्या खजिनदारांनी सांगण्यात आले आहे.